परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या पत्रानुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई व अंतर्गत खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये मा. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. या लोकअदालतीमध्ये पक्षकार/Stakeholders सहभाग घेवू शकतात. ज्या पक्षकार/ Stakeholders यांची प्रकरणे प्रलंबित असुन तजडजोडीने मिळविण्याची इच्छा असल्यास त्याबाबत त्यांनी त्यांच्या सन्माननीय विधीज्ञांशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत मा. उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अर्चना एम. तामणे जिल्हा विधी…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) ग्रंथ वाचक भानुदासजी साबळे, पंडितराव प्रधान, गौतम मुंडे, विजय लोखंडे, दशरथ झिंझाडे, नामदेवराव गायकवाड, सखाराम जोंधळे, आशाताई साबळे, मंगल भक्ते,सुजाता नगर येथे बुद्धधम्म ग्रंथ वाचन समाप्ती कार्यक्रम संपन्न . कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. सुजाता बुद्ध विहारात मागील तीन महिन्यांपासून दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचे वाचन करण्यात आले.या ग्रंथाचे वाचन मा. बौद्धाचार्य भानुदासजी साबळे गुरुजी व श्रीमती रेखाताई रगडे यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ग्रंथ वाचन कर्ते यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौ.पुष्पाताई सुरेशराव सदावर्ते आणि सोनकांबळे बाबा उपासक श्री.ज्ञानोबा गायकवाड यांचा ही सत्कार…
पालम ( प्रतिनिधी ) श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ पालम संचलित… महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय पालम येथिल नवनियुक्त मुख्याध्यापिका सत्कार समारंभ दि.18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी प्रा.शाळा पालम येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे सत्कारामूर्ती सौ. मालताताई गजानन रोकडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेशराव रोकडे दादा (सचिव श्री ग.शि.प्र.मं. पालम तथा संचालक जि.म.स.बँक परभणी हे उपस्थित रहाणार आसुन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री निलपत्रेवार (गट शिक्षणाधिकारी पं.स. पालम), रामराव रोकडे सर, लक्ष्मणराव रोकडे (नगर सेवक न.प.पालम), बालासाहेब रोकडे (अध्यक्ष: श्री ग.शि.प्र.मं. पालम), गजानन रोकडे (अध्यक्षकृ.ऊ.बा.स. पालम), व्ही.एस.पवार (माजी मु.अ.) अदि उपस्थित रहाणार आहेत.
सेलू (प्रतिनिधी) असंख्य गोष्टींमुळे डोके तुंबते. काळ नाही तर मनातील विचारांचे ओझे माणसाला म्हातारपण देते. त्यामुळे विचार डोक्यात यावेत काम करून निघून जावेत. ही विचारांची स्वच्छता ज्यांना करता येते. तो माणूस सुखी होतो. असे आशिर्वचन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी दिले. शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हनुमानगढ परिसरात गुरूवार ( दि. १७ ) रोजी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी व अमोघ अमृत वाणीतून सुरू असलेल्या रामकथेचे तृतीय पुष्प भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. रामकथेसाठी वृंदावनधामचा देखणा मंच उभारण्यात आला होता. बालपणीचे पारतंत्र्य, यौवनातील विषयासक्ती, वृध्दापकाळातील रोगराई , नंतर मृत्यू असेल तर…
परभणी, (प्रतिनिधी) मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज निवडणुकीशी संबंधित सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह निवडणुकीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, लोकसभेची…
परभणी( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात मागील महिनाभरात पिंगळी, वडगाव आणि पोखर्णी येथे चालत्या रेल्वला सिंगल मध्ये बिघाड करून त्या थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पोलीस संरक्षण मिळावे म्हणून परभणी येथे रेल्वे स्थानकावर जी आर पी पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापक यांना एक निवेदन पाठवण्यात आले असून त्यात म्हटले आहे की परभणी जिल्ह्यात मागील तीस दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सिग्नल मध्ये बिघाड करून रात्रीच्या सुमारास रेल्वे थांबवून प्रवाशांना लुटीच्या घटना घडल्या आहेत.त्या मुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवासी असुरक्षित झाले आहेत. जिल्ह्यात पिंगळी, पोखरणी तसेच वडगाव…
परभणी ( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व सिद्धार्थ पानबुडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आ.डॉ. पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी पानबुडे म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनत प्रवेश करत आहे. हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रखर, ज्वलंत विचारांची कधीही न संपणारी ऊर्जा होते. त्यामध्ये भलेभले अविचारी भस्मसात झाले. त्यांच्या विचारांची मशाल पेटवून आम्ही नव्याने क्रांती करू आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देऊ की, माणसे आपल्यातून निघून जातात परंतु त्यांचे विचार…
सेलूत श्रीराम कथेची उत्साहात सुरुवात सेलू, (, प्रतिनिधी ): रामकथेची किती संस्करणे निघावेत ? रामकथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. रामचंद्रांचा गोडवा इतका आहे की; परिचय झाला की आपोआप वेड लागते. एवढेच नव्हे तर कथेचे श्रवण करणारांना संपूर्ण वैदिक धर्म काय आहे ? हे आपोआप कळते. धर्म म्हणजे काय ? हे कळून घ्यायचे असेल, तर भाराभर ग्रंथ वाचण्याची गरज नाही. भगवान श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेच्या प्रारंभप्रसंगी मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी स्वामीजी बोलत होते. कथेच्या प्रारंभी सकाळी सेलू शहरातून भव्य…
विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान तर शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची परभणी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर…
परभणी प्रतिनिधी : लोकसभा च्या तुलनेत विधानसभेला जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे जेणेकरून जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढेल. आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देखील या वेळेस जिल्हाधिकारी गावंडे यांनी दिली. आज बुधवार दिनांक 1५ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या घोषणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. काल निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा 2024 ची घोषणा करण्यात आली 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे अधिसूचना जारी करणे 29 ऑक्टोबर रोजी नाव निर्देश पत्र दाखल करणे 30 ऑक्टोबर रोजी छाननी 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेणे शेवटची तारीख तर 20 नोव्हेंबर…

