परभणी(प्रतिनिधी )मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जगातल्या नऊ भाषावर प्रभुत्व होते. त्यांनी मराठी भाषेत भाषेत सर्वात प्रथम दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरु केले. त्यांचा पत्रकारितेतील वारसा जपणे हे आपल्या पत्रकारांचे कर्तव्यच आहे. अत्यंत कमी आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री जांभकरांची पत्रकारितेची परंपरा, त्यांचा वारसा आजच्या पत्रकारांनी जपणे आवश्यक आहे असं प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी केले.
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं बाळाशास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शहरातील अतिथी हॉटेल या ठिकाणी आयोजित करण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवलिंग बोधने, डॉ. सुनील तुरुकमाने, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभु दिपके, हल्ला विरोधी कृती समितीचे रामेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, राजकुमार हटेकर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. नाईकवाडे म्हणाले की पत्रकारिता ही आधुनिक झाली आहे. आणि आव्हानही तेवढेच वाढले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या समर्थनात आपण जेव्हा लिखाण करतो तेव्हा आपल्याला वाहवा करत समर्थन करतात. परंतु एखाद्या वेळी आपण एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढत असताना त्यांचे मन दुखते. परंतु आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे. कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात आकस भावनेने पत्रकारिता करु नये असेही ते म्हणाले. यावेळी विठ्ठल वडकुते, सुधाकर श्रीखंडे, मोईन खान, अनिल दाभाडकर, प्रशांत खंदारे, भूषण मोरे, संजय बगाटे, शिवशंकर सोनुने, राहुल वहिवाळ, बालाजी कांबळे, नजीब सिद्दिकी, बाळू घिके, सय्यद जमील, सय्यद खिजर, हरीभाउ सुतारे, संजय घनसावंत, राहुल पुंडगे, शेख आजर, शेख इस्माईल, सदाशिव राऊत, आदी मोठ्या प्रमाणावर पत्रकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केले तर आभार सुधाकर श्रीखंडे यांनी मानले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


