पालम (प्रतिनिधी) पालम येथे सार्वजनिक शिवाजी महाराज यांची जयंती सपंन्न झाली या जयंती निमित्त दाेन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.18 पासुन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी सामूहिक रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबीरात 101 शिवप्रेमीनी रक्तदान केले. व राज्य पुरस्कारप्राप्त रवीद्र तम्मेवार यांचे शिवव्याखान झाले. दि.19 रोजी दुपारी हभप सदानंद महाराज फळेकर यांचे हरिर्कीर्तन संपन्न झाले यानंतर दुपारी 4 वाजता पालम शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली

या मिरवणुकीत मुख्यआर्कषण म्हणजे वासुदेव, वारकरी, गोधळी, शिवरायांचा सजीव देखावे, लेझीम पथक, घोडेस्वार, ढोल पथक, झांज पथक, हलगी पथकाचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराजांचीम अश्वारूढ मूर्ती बँडच्या गजरात निघाली तर संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, पालम यांच्या वतीने भव्य टाळ-मृदंगाच्या गजरात शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या सार्वजनिक शिव जन्मोत्सव समिती व तालुक्यातील समस्त शिवप्रेमी उपस्थित होते.

या मिरवणूकीस उपविभागीय अधिकारी जिवराज दापकर यांनी भेट दिली तर या वेळी पोलीस निरक्षक सुरेश थोरात यांनी चोक पोलीस बदोबस्त लावला होता.


