परभणी (प्रतिनिधी) बुद्धगया ते सारनाथ , लुंबिनी पर्यंत ३१ मार्च २०२५ पर्यंत आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय धम्म पदयात्रेची आज दि .१८ मार्च रोजी बुद्धगया महाविहार येथून भंते सोमतोफ यांच्या हस्ते उदघाटन करून सुरूवात करण्यात आली.
यावेळी थायलंड येथील भदंत सोंगसेन फँटफियन, महाउपासिका सिरीलक मैथाई, कॅप्टन नटकीट सिने अभिनेते तथा धम्मदूत डॉ गगन मलिक, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभाग, थायलंड येथील नामवंत उद्योगपती उपासिका कुंतीम व थायलंड येथील भदंत अजंतानो आदी भिक्खु संघ उपासकांची उपस्थिती होती.
धम्म पदयात्राचे हे दुसरे वर्ष असून बुद्धांच्या जन्मभूमी लुंबिनी पर्यंत हि धम्म पदयात्रा काढण्यात येणार आहे. सदर धम्म पद यात्रा बुद्धांच्या जन्मभूमी पासून सारनाथ , लुंबिनी पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या धम्म पदयात्रेच्या सुरुवातीस बुद्ध मूर्तीस अभिवादन करण्यात आले बुद्ध वंदना पूजा विधी घेण्यात आला.


