पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील सुरू असलेल्या बारावी परीक्षा केंद्रावर दि.१७ रोजी अचानक भेट दिली या ठिकाणी दोन विद्यार्थी कॉपी करताना त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यावर परीक्षा महामंडळ बोर्डाच्या निदर्शनानुसार कारवाई केल्यामुळे इतर केंद्रातील विद्यार्थ्यांचे धाबे दनानले.
पालम तालुक्यातील जय भवानी उच्च माध्यमिक आश्रम शाळा मोजमाबाद तांडा शाळेला भेट दिली. आजपर्यंत या केंद्र
वर कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. या केंद्रात कॉप्याचा सुळसुळाट सुरू होता.आसल्याची अनेक दिवसा पासुन चर्चा होती. पालम येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केंद्रावर अचानक जाऊन सुरू असलेल्या परिक्षा केंद्रस्थानी पाहणी करताच या ठिकाणी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. या विद्यार्थ्यांजवळ परीक्षा केंद्रावरच अपेक्षित संच आढळून आल्याने या विद्यार्थ्यांवर परीक्षा मंडळाच्या निकषानुसार कारवाई करण्यात आली.या मुळे तालुक्यातील परीक्षा केंद्राचे घाबे दानानले असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान परिक्षा केंद्रावर विविध पथकांसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.


