परभणी,(प्रतिनिधी) : पूर्णा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने 14 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश श्रीमती एस.एस. नायर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
पूर्णा येथील एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2019 मध्ये आरोपी मनोज लक्ष्मण रोत्रे याने बळजबरीने सातत्याने अत्याचार केले. त्या दरम्यान ती मुलगी गर्भवती राहिली, तीने एका मुलालाही जन्म दिला. त्यानंतर या आरोपी विरुध्द पूर्णा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांनी तपास केला. न्यायालयात खटला उभा केला. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. आनंद गिराम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. 11 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने त्यानंतर आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, राजू दहिफळे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


