सेलू, (प्रतिनिधी): प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे आज फिनलंड पालकत्व कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने करण्यात आले होते. डॉ. संजय रोडगे, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत ऑनलाइन आणि ऑफलाइन सत्रांद्वारे पालकांना मुलांच्या शिक्षण आणि पालकत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन सत्रात फिनलंड येथील मिला वान दर बरघ, सीईओ, किंडलडेज, टॅम्परे, फिनलंड यांनी फिनलंडच्या प्रगत शिक्षण पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी फिनलंडच्या शिक्षण पद्धतीतील वैशिष्ट्ये, विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन आणि कृती आधारित शिक्षण यावर प्रकाश टाकला. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. ऑफलाइन सत्रात प्रसिद्ध युट्यूबर आणि मोटिव्हेशनल…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) मराठवाडा हा आयटी क्षेत्राच्या दृष्टीने कायम मागास समजला जातो, मात्र परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच आयटीच्या संधी निर्माण होत आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डिकर-साकोरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात पहिली आयटी कंपनी येत असून जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांच्या पोरांना यामध्ये संधी दिल्या जाणार आहेत. तीन वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये बाप कंपनीची सुरुवात झाली होती, ज्याची चर्चा राज्यभर झाली. रावसाहेब घुगे यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून खेड्यातील मुलांसाठी काही तरी केलं पाहिजे या विचारातून या कंपनीची सुरुवात केली होती. आजघडीला त्यांच्याकडे शिकाऊ विद्यार्थी आणि कर्मचारी असे मिळून ६०० पेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत आणि संगमनेरपासून काही अंतरावर असलेल्या पारेगावात त्यांनी भव्य आयटी कंपनी सुरु केली आहे. हीच आयटी…
परभणी (प्रतिनिधी)आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांना ईट राईट कॅम्पस (Eat Right Campus) ने सम्मानित करण्यात आले आहे. ईट राईट कॅम्पस हा भारतातील खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांचा एक उपक्रम आहे. याचा उद्देश शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यस्थळे आणि रुग्णालये यांसारख्या कॅम्पसमध्ये सुरक्षित, निरोगी आणि शाश्वत खाद्य पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे.मुख्य उद्दिष्टे: कॅम्पसमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित अन्न पुरवठा सुनिश्चित करणे.निरोगी खाद्य: पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्रोत्साहन देणे.शाश्वतता: पर्यावरणपूरक खाद्य पद्धतींचा अवलंबन करणे.प्रमाणन प्रक्रिया:कॅम्पसना FSSAI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते.FSSAI द्वारे मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदारांमार्फत खाद्य सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन दिले जाते.कॅम्पसच्या सुविधांचे मूल्यांकन आणि कमतरतांचे निराकरण केले जाते.अंतिम ऑडिटनंतर कॅम्पसला…
परभणी, (प्रतिनिधी) : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवार, दिनांक 16 जून 2025 पासून होणार आहे. यानिमित्ताने पहिल्या व दुसऱ्या दिवशी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये संबंधित क्षेत्रातील मंत्री व अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी होणार असून, ते विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी यावर्षी ‘दत्तक शाळा योजना’ही राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा शासकीय अधिकाऱ्यांनी दत्तक घ्यायच्या आहेत. या शाळांना वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी वर्षभर भेट देतील, शाळेतील…
प्रथमच परभणीत महाराष्ट्रातील पहिली ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न परभणी( प्रतिनिधी) महाराष्ट्रामध्ये जलक्रीडेसाठी प्रचंड क्षमता आहे आणि ड्रॅगन बोर्ड सारख्या स्पर्धांमुळे तरुणांना एक नव व्यासपीठ मिळत आहे त्यामुळे ड्रॅगन बोर्ड सारख्या जलक्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे असे मत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले आहे. ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे राज्य संघटनेचे सचिव दिनेश मुंडे कोषाध्यक्ष भागवत चाटे व संघटनेचे प्रभारी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन व परभणी जिल्हा ड्रॅगन…
परभणी (प्रतिनिधी) मौजे पेडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी दि 10 जून रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शहीद खान उपस्थित असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे शिवसेनेचे नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष परभणी धैर्यशील (राजू) कापसे पाटील तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष परभणी, आनंद भरोसे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे . प्रमुख उपस्थिती म्हणून सोनल देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख पाथरी विधानसभा मुंजाभाऊ नाना टाकळकर शिवसेना महानगर अध्यक्ष परभणी नितेश देशमुख तसेच शिवसेना तालुकाप्रमुख परभणी माऊली कदम आर्वीकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद लोहगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.…
परभणी (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, राज्यस्तरावरून सदरील निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक कारणाने, असमन्वय झालाच तर स्वतंत्र लढायची गरज पडलीच तर आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, कार्यकर्त्यांनी , पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचीही तयारी असू द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ राजेश विटेकर यांनी परभणी येथील संवाद व संघटनात्मक बैठकीत बोलताना सांगितले. सन 2014 प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका ,पंचायत समिती, जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूनी एक नंबर वर असल्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था वर राष्ट्रवादी…
परभणी (प्रतिनिधी)आज कृषी विज्ञान केंद्र परभणी च्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प अभियान कार्यक्रमात रूढी व खरबा परिसरातील संत्रा बागायतदार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे उपसंचालक संशोधन प्राध्यापक डॉ हरिहर कौसडीकर यांनी संत्रा बागेसाठी जमिनीचे आरोग्य आणि संतुलित पीक पोषण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी बहार व्यवस्थापन, फूल गळ, फळगळ, रोग व कीड व्यवस्थापन , दर्जेदार फळ उत्पादन या बाबत प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले. डॉ कौसडीकर यांनी सध्या परभणी परिसरातील संत्रा बागेतील जमिनीचे आरोग्य बिघडलेले निदर्शनास आले असून सेंद्रिय कर्ब कमी झाले असून सहा ते आठ अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत त्यामुळे…
मुंबई, – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘खरीप हंगामात पेरणीची तयारी व पीकांचे नियोजन’ या विषयावर परभणी जिल्ह्यातील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक तसेच जमिनीचे आरोग्य आणि पिकांचे पोषण तज्ज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ६, शनिवार दि. ७, सोमवार दि. ९ आणि मंगळवार दि. १०, जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला…
परभणी( प्रतिनिधी ) शासनाने केलेल्या पीक कापणी प्रयोगात पिकांचे उत्पन्न कमी आलेले आहे मात्र कंपनीने केलेल्या पीक कापणी प्रयोगात उत्पन्न जास्तीचे आलेले आहे, कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न निघाल्याचे दाखवले आहे ते मान्य नाही असे कारण दाखवून icici लोंबार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा देण्यासाठी चालवलेली बनवा बनवी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावली, जर शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी दबाव टाकून कमी उत्पन्न दाखवले आहे अशी तक्रार तुम्ही त्याचवेळी जिल्हाधिकारी यांच्या कडे नोंदवली होती का ? तसेच एखाद्या ठिकाणी तसा प्रकार झाला असेल असे आपण मान्य केले तरी सर्व जिल्ह्यात तसे प्रकार झाले होते याला पुरावे काय आहेत,…