परभणी (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी श्री. शिवाजी शेषरावजी भरोसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अपरंपार ईश्वरी कृपा तसेच सर्व भक्तगणांच्या प्रेम-आशीर्वादातून ही निवड झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निवडीसह देवस्थान समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये सचिवपदी माणिक शिंदे, उपाध्यक्षपदी ज्ञानोबाराव जावळे, कोषाध्यक्षपदी नामदेवराव चव्हाण तर सहसचिवपदी रामेश्वर शिंदे यांची निवड झाली आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना शिवाजी शेषरावजी भरोसे यांनी ही निवड म्हणजे ईश्वराने दिलेली सेवाधर्म निभावण्याची पवित्र संधी असल्याचे सांगितले. देवस्थानाचा सर्वांगीण विकास, भक्तांची सेवा तसेच धार्मिक परंपरेचे जतन करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या बिनविरोध निवडीनंतर भाविक, मान्यवर व ग्रामस्थांकडून नवनियुक्त अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, श्री ओंकारनाथ महाराजांच्या कृपेने देवस्थानाच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.


