मुंबई, (प्रतिनिधी) : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेवून दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सहयाद्री…
Author: Lok Sanchar
परभणी तालुक्यातील लाभार्थींना उपस्थित राहण्याचे आवाहन परभणी, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिन व दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जयंती निमीत्य महाराष्ट्र शासनाच्यावतीने परभणी विधानसभा मतदारसंघ अतंर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन दि.२२ जुलै २०२६ रोजी “अश्वमेध” क्रिडा मैदान जवळ “दिक्षांत समारंभ सभागृह” वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथे आयोजीत केले आहे. सदर शिबीरासाठी महिला बाल विकास विभाग, विभागीय वन अधिकारी कार्यालय, परभणी, शालेय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, भुमी अभिलेख विभाग, महिला बचत गट / महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती घरकुल व ग्रामविकास विभाग, दस्त नोंदणी व मुद्रांक विभाग, कृषी…
परभणी,(प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाबाबत सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह, बदनामीकारक व चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी रविराज साबळे उर्फ अण्णासाहेब शेषनाथ साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात या युनियनचे राज्य अध्यक्ष संजीव निकम व राज्य सरचिटणीस सुचित परत यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन ही राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाची मान्यताप्राप्त संघटना असून राज्यभरातील हजारो ग्रामपंचायत अधिकारी या संघटनेचे सदस्य आहेत. रविराज साबळे यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाबाबत अत्यंत बेजबाबदार, अपमानास्पद, अश्लील व…
परभणी, (प्रतिनिधी) ) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे हा आहे. साहित्य किंवा कला क्षेत्रात आयुष्य समर्पित केलेल्या आणि सध्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग अर्जदारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता देण्यात आली असून, त्यांच्यासाठी किमान वय…
परभणी ( प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी आज (१४ जुलै) पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यापूर्वी प्रशासनाला अनेक निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. उपोषणकर्त्यांनी कुलगुरू, वनामकृवी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ न देण्याबाबत आश्वासन मागण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने अखेर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये भरती प्रक्रियेला मुदतवाढ न देणे, वनामकृवी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना…
परभणी :(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ₹३६,५८५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजी भरोसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांचेही शेतकरी हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय साकार करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. शिवाजी भरोसे म्हणाले की, महायुती…
परभणी, ( प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजने (2026-27) अंतर्गत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती लता वाकळे, विधान परिषद सदस्य सईद खान, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा नियोजन अधिकारी…
परभणी ( प्रतिनिधी )शहरातील लोकमान्य नगर येथील जेष्ठ नागरिक शांताबाई भानुदासराव बोरुळ (वय ९५) यांचे दिनांक१३जुलै रोजी सकाळी ७ वाजता निधन झाले जिंतूर रोड येथील अमरधाम स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले , एक मुलगी तीन सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय स्टेट बँकेचे सेवा निवृत्त अधिकारी किशोर बोरूळ तसेच चंद्रकांत बोरूळ, पत्रकार दिलीप बोरूळ यांच्या त्या मातोश्री होत.
परभणी,(प्रतिनिधी) : दिल्लीतील भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात सोमवार 13 जूलै रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठविण्यात आले. त्याद्वारे, नाझिया इलाही खान यांनी विविध जाहीर सभा तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमधून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या विधानांमुळे देशभरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली असून धार्मिक…
परभणी(प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा बलाच्या नांदेड विभागाने जून 2026 महिन्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या विविध विशेष मोहिमांमधून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, हरविलेल्या व्यक्ती व मालमत्तेचा शोध, महिला प्रवाशांना सुरक्षा व सहाय्य, तसेच रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांना चांगले यश मिळाले आहे. रेल्वे सुरक्षा बलाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत तीन अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. ‘अमानत’ मोहिमेद्वारे हरविलेल्या मालमत्तेच्या दहा प्रकरणांमध्ये तब्बल 2 लाख 5 हजार 500 रुपयांची मालमत्ता शोधून संबंधित प्रवाशांना परत करण्यात आली. ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सामान चोरीच्या 17 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. या कारवाईत 22 संशयितांना…

