परभणी (प्रतिनिधी) आ.डॉ. राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डर्माटो-लेसर विभाग म्हणजे त्वचा आणि केस रोगावर अत्याधुनिक लेसर थेरपीद्वारे उपचार या लेसर विभागाचे उद्घाटन आज हॉस्पिटलचे अधिष्ठता डॉ.प्रमोद शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
आर.पी.हॉस्पिटल येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आर.पी हॉस्पिटल जगातील नवनवीन तंत्रज्ञान परभणीत आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डर्माटो लेसर अद्यावत विभागाची सुरूवात आज करण्यात आली आहे.
या प्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित तडवी, डॉ. फैज, डॉ. करण जाधव, डॉ. रेवती तसेच नव्याने सुरू झालेल्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष कदम आणि डॉ. दिनेश भूतडा हे उपस्थित होते.
यावेळी डॉ.प्रमोद शिंदे म्हणाले,“आज आपण फक्त एक नवीन विभाग सुरू करत नसून परभणी आणि संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला जगातील सर्वोत्तम त्वचा व केसांच्या लेसरद्वारे उपचारांची सुविधा आपल्या शहरातच उपलब्ध करून देत आहोत. ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना मुंबई-पुण्यात जाण्याची गरज यापुढे भविष्यात पडणार नाही, ही खूणगाठ आपण सर्वांनी बांधायची आहे.
*विभागात उपलब्ध अत्याधुनिक सुविधा*
नवीन विभागात खालील अत्याधुनिक यंत्रसामुग्री व उपचारपद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
केमिकल पीलिंग (Chemical Peeling)
मायक्रोडर्मअब्रेशन (Microdermabrasion)
पुव्हा थेरपी (PUVA Therapy)
क्रायो थेरपी (Cryotherapy)
डायोड लेसर (Diode Laser Hair Removal)
एन.डी. याग लेसर (Nd:YAG Laser)
रेडिओ फ्रिक्वेंसी सर्जरी (Radiofrequency Surgery)
कॅव्हिटेशन लिपोलिसिस (Cavitation Therapy)
मेसोथेरपी (Mesotherapy)
हायड्राफेशियल (Hydrafacial)
ट्रायकोस्कोपिक हेअर स्कॅनिंग (Advanced Hair Scanning)
आय-ग्रो हेअर लेसर थेरेपी (I-Grow Hair Laser Therapy)
हेअर ट्रान्सप्लांट (FUE & FUT Technique)
ग्लुटाथायोन स्किन व्हायटेनिंग थेरपी (IV Glutathione Therapy)
बायो-लाइट थेरपी (LED Biolight Therapy)
या सर्व उपचारपद्धती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असून, अत्याधुनिक लेसर मशिन्स व यंत्रसामुग्री अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरियातून आयात करण्यात आली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे स्वप्नील बोर्डे, राहुल गायकवाड, अतुल लोंढे, विनायक गुज्जर आदींनी परिश्रम घेतले.
लवकरच येथे विशेष सवलतीच्या पॅकेजेस आणि मोफत त्वचा तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.


