परभणी,(प्रतिनिधी) : सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून 5 टक्के दिव्यांग कल्याणार्थ राखीव निधीचा उपयोग करून ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबविण्यात येत आहेत. संबंधित योजनांसाठीचे अर्ज www.sakshamparbhani.in या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी आर. व्ही. चकोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0 ते 6 वयोगटातील दिव्यांग मुलांच्या उपचारासाठी माता/पालकांना निर्वाह भत्ता : या योजनेअंतर्गत उपचाराच्या काळात दिव्यांग मुलांच्या पालकांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. अर्हता व आवश्यक कागदपत्रे : वयोमर्यादा : 0 ते 6 वर्षे, 40 टक्के व त्यावरील युडीआयडी वैद्य दिव्यांग प्रमाणपत्र, सन 2025-26 चे तहसिलदार यांनी दिलेले पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र (मर्यादा – रु. 1 लाख), ग्रामीण भागातील रहिवासी दाखला, बँक पासबुक, राशन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र, टी.सी., आधार, सनद.
दैनंदिन दिनचर्या समजत नसलेल्या व काळजीवाहकाची आवश्यकता असलेल्या दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक सहाय्य : ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वकाळजी घेणे कठीण आहे व ज्यांना काळजीवाहकाची गरज आहे, त्यांच्या पालकांना अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. अर्हता व आवश्यक कागदपत्रे : वयोमर्यादा : 7 वर्षे व त्यापुढे 40 टक्के व त्यावरील युडीआयडी वैद्य दिव्यांग प्रमाणपत्र, तहसिलदार यांनी जारी केलेले सन 2025-26 उत्पन्न प्रमाणपत्र (मर्यादा – रु. 1 लाखपर्यंत), ग्रामीण भागातील रहिवासी दाखला, बँक पासबुक, राशन कार्ड, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून दिलेले केअरटेकर प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र, टी.सी., आधार, सनद.
इच्छुकांनी संबंधित योजनेसाठीचे दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज www.sakshamparbhani.in या पोर्टलवर ऑनलाईन सादर करावेत. योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती तसेच मार्गदर्शक सूचना पोर्टलवर उपलब्ध असल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
*-*-*-*-*


