परभणी,(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरावर कठोर कारवाई करून महापौरांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, 9 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान परभणी महानगरपालिकेतील महापौर दालनात शेख रफिक नामक व्यक्तीने महापौर सय्यद इकबाल यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण तसेच सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.…
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी (एमसीवाय) वाहनांसाठी लवकरच एमएच-22-बीएम ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांच्या नावे कार्यालयात दि. 10 ते 13 जुलै 2026 या कालावधीत दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 11 सहा. रोखपाल यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. नविन नोंदणी वितरकांच्या स्तरावर होत असल्यामुळे लिलाव दिनांकात व सिरीज सुरु करण्याच्या दिनांकात बदल करण्याचे पूर्ण अधिकार या कार्यालयाकडे राहील. एका पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासच लिलाव घेण्यात येईल.…
परभणी,प्रतिनिधी) : शहरातील मातोश्री नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 93 हजार 423 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनराव बापुराव कदम (वय 74, रा. मातोश्री नगर, परभणी) हे आपल्या मुलगी सोनाली कदम यांच्यासह 1 जुलै रोजी घराला कुलूप लावून सातारा येथे मुलाखतीसाठी गेले होते. त्यानंतर ते पुणे येथे मुलाकडे मुक्कामी राहिले. 6 जुलै रोजी सकाळी किशनराव कदम हे परभणीतील घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात प्रवेश करून…
सेलू,(प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका 20 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सेलूत उघडकीस आला असून, याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एका आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासवून लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर लग्न झाल्याचा विश्वास निर्माण करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार शहरातील एका लॉजमध्ये तसेच आरोपींच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींसह एका महिलेने तिला नकार दिला. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्याचा आणि…
परभणी ( प्रतिनिधी) गॅस सिलेंडरच्या सुरक्षित वापराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन, दिल्ली यांनी तयार केलेले “भाई आया रे गॅस सिलेंडर” हे सुरक्षा गीत आता परभणी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर वाजवले जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. फाउंडेशनचे कार्यकारी संचालक शुभम रंगारी यांनी 28 एप्रिल 2026 रोजी याबाबत निवेदन सादर केले होते. गॅस गळती, सिलेंडर हाताळणी आणि सुरक्षिततेचे नियम यांची माहिती लोकांपर्यंत सहज पोहोचावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. यामुळे…
परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील प्रमुख रस्त्यांवर वर्षानुवर्षे उभी असलेली बेवारस व जुनाट वाहने हटविण्यासाठी परभणी शहर महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिका कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस शहर वाहतूक शाखेचे अधिकारी दंतुलवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध मुख्य मार्गांवर दीर्घकाळापासून उभी असलेली वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यापूर्वी अशा वाहनांमुळे अपघात तसेच इतर अनुचित घटनाही घडल्याची बाब बैठकीत चर्चिली गेली. यापुढे सार्वजनिक रस्त्यांवर सोडून दिलेल्या किंवा दीर्घकाळ उभ्या असलेल्या वाहनांमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास…
परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानांतर्गत विष्णू जिनिंग परिसरातील बंद करण्यात आलेल्या कचरा कुंडीत पुन्हा कचरा टाकणार्या व्यापार्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. याचवेळी सिंगल-यूज प्लास्टिक, कॅरीबॅग आणि प्लास्टिक कंटेनरचा वापर करणार्या व्यापार्यांवरही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने राबविलेल्या या संयुक्त मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणार्या संबंधित व्यापार्यांकडून एकूण 6 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच बंद करण्यात आलेल्या कचरा कुंड्यांचा वापर करणे हे नियमबाह्य असून अशा प्रकारच्या कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सिंगल-यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी…
परभणी,प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीत परभणीच्या दोन संस्थांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या रंगभूमीचा गौरव वाढविला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात राजीव गांधी युवा फोरम आणि क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्टच्या कलावंत व तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. राजीव गांधी युवा फोरम, परभणी निर्मित ‘संपूर्ण’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावत स्पर्धेत आपला ठसा उमटविला. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक विजय करभाजन असून निर्माते संजय पांडे आहेत. नाटकासाठी विजय करभाजन यांना प्रथम दिग्दर्शन पारितोषिक प्राप्त झाले. तसेच किशोर पुराणिक आणि डॉ. अर्चना चिक्षे यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदकासह…
परभणी,(प्रतिनिधी) आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी (हृदयरोग) विभागाने आज यशस्वीरित्या २००० कॅथ लॅब प्रक्रिया पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्व शस्त्रक्रिया व प्रक्रिया शासकीय योजनांच्या अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असून, यामुळे रुग्णांवरील मोठा आर्थिक भार टळला आहे. केवळ परभणीच नव्हे, तर हिंगोली, धाराशिव, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेड आणि बुलढाणा या ८ हून अधिक जिल्ह्यांतील गंभीर रुग्ण उपचारासाठी आर. पी. हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. येथे त्यांच्यावर वेळेत आणि यशस्वी उपचार करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. कोरोनरी अँजिओग्राफी १५६७…
परभणी, (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी द्वारे क्रीडागंण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी दि. 07 जुलै, २०२६ ते दि. 22 जुलै २०२६ या कालावधीत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले. व्यायामशाळा विकास अनुदान योजना या उपक्रमांतर्गत दैनंदिन दिनचर्यामध्ये फिटनेसचा समावेश करण्याच्या उद्देशाने लठ्ठपणाशी लढण्यासाठी, आपल्या तंदुरुस्तीच्या व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणुन संतुलीत शारीरिक व्यायाम आणि हालचाली करणे अत्यावश्यक आहे. निरोगी राष्ट्राच्या उभारणीत नियमित शारीरिक व्यायाम आणि खेळांचे महत्व नागरिकांमध्ये रुजावे याकरीता हे दोन महत्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. क्रीडागंण…

