परभणी ( प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज मुंबई येथे ऑनलाईन बैठक घेतली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अंडर ग्राउंड ड्रेनेज , कर्मचारी सेवानिवृत कर्मचारी यांच्यासाठी सहाय्यक अनुदान, नाट्यगृह, तसेच क्रीडांगण साठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील जमीन हस्तांतरण, यासह इतर विकासकामाबाबत चर्चा झाली जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी सर्व सुयोग्य प्रस्ताव तयार करून माझ्याकडे सादर करावेत मी स्वतः त्या त्या मंत्री व सचिव यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी माझी यंत्रणा कामाला लावणार आहे या बैठकीस पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर आ राजेश विटेकर आ रत्नाकरराव गुट्टे आ राहुल पाटील यांच्या सह प्रधान सचिव नगरविकास गोविंदराज जिल्हाधिकारी…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) मागील बरेच दिवसापासून पेडगावं येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असून गावकऱ्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते मात्र तेही काम बऱ्याच दिवसापासून रेंगाळत आहेत.त्यामुळे ग्रामपंचायतने हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी उपायोजना करणे आवश्यक होते, मात्र ग्रामपंचायत च्या वतीने कुठलीही पर्याय उपाययोजनांना करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांच्या वतीने आज ग्रामपंचायत मोर्चा घागर मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायत चे कुणीही जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संतप्त महिलांनी पेडगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याप्रसंगी ग्रामस्थ व महिला मोठ्या…
परभणी (प्रतिनिधी) पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विकास आराखड्याच्या बैठकीत दिली . तसेच नवीन विकास आराखडा पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून आ राजेश विटेकर यांच्याकडे सोपवित आहे असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बैठकीत दिले , पाथरी येथील विकास आराखड्या बाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी नाराजी दर्शविली अत्यंत छोट्या स्वरूपात व ज्या व्यक्तीस कोणत्याही मोठ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा अनुभव नाही अशा विकासक, सल्लागाराने हा आराखडा तयार केलेला आहे, पंढरपूर, शेगाव, माहूर अशा देवस्थानचा आराखडा तयार…
पालम (प्रतिनिधी) येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत अखंड नामजप व यज्ञ सप्ताह मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. आज शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता झाली. सकाळी साडेदहा नंतर आरती व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी आरती व महाप्रसादाचा लाभ भक्तीमय वातावरणात घेतला.
गंगाखेड (प्रतिनिधी) ध्येयप्रकाशन पाचगणी आयोजित *आय एम द विनर* ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर संपन्न झाली. त्यामध्ये सरस्वती विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी राघव राजेश लोंढे याने परभणी जिल्ह्यातुन सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल सरस्वती विद्यालय परिवारातर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, परीक्षा विभाग प्रमुख गोपाळ मंत्री, पालक राजेश लोंढे सह इतर सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
परभणी,(प्रतिनिधी) येथील आर. पी. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेली ६२ वर्षीय बेशुद्ध अवस्थेत दाखल झालेल्या महिलेला टेम्पररी पेस मेकर या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करत जिवदान दिले आहे. आ.राहुल पाटील यांच्या आर. पी. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेली ६२ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत दाखल झाली होती.रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने केलेल्या इसीजी व इतर तत्सम तपासणीनंतर तिचे हृदयाचे ठोके अनियमित व अतिशय कमी प्रमाणात होते, अपुरे रक्तपुरवठ्यामुळे हृदययाची स्पंदने निर्माण करणारे नोड अतिशय कमकुवत झाले असे आढळले. हृदयाचा रक्त पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्याचे ठरले, परंतु हृदय गती अतिशय कमी असल्या कारणाने (कम्प्लिट हार्ट ब्लॉक ) यावर उपचार म्हणून हृदयात…
परभणी ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारउद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या सोबत माजी मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती आ राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड येथून श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे सकाळी नऊ वाजता दर्शन साठी येणार आहेत तर त्यानंतर साडे दहा वाजता जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर महानगरपालिका कार्यालयात महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामाचा आढावा घेतील, या शासकीय कार्यक्रमानंतर दुपारी बारा वाजता अक्षता मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता…
पालम (प्रतिनिधी) दि.25 रोजी पालम शहर बंद चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यापारी, हॉटेलमालक, दुकानदार, यांनी स्वयंफुर्रतेनी बंचे आयोजन केले होते. तसेच विविध सामाजिक संघटना सकल समाजा कडून पालम नायब तहसिलदार राजेश्वर पवळे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात याना निवेदन देण्यात आले,या निवेदनात जम्मू-काश्मीर राज्यातील पर्यटनस्थळ पहेलगाम या ठिकाणी हिंदू बांधव का म्हणून गोळ्या घालण्यात आलेल्या अतिरेक्यांनी बेछूट गोळ्या झाडून 27 लोकांचा जीव जीव घेतलेला आहे तर काही जणांना गंभीर जखमी केले. या मुळे पालम येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 25 एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ स्वयं स्फूर्तीने शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान सकाळी 11 वाजता सर्व सामाजिक बांधव एकत्र…
परभणी(प्रतिनिधी)जम्मू – काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि० २४)रोजी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्यावतीने काल बुधवार रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध म्हणून परभणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या आवाहनाला प्तिसाद देत परभणी शहरातील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने, प्रतिष्ठाने आणि अंतर्गत वाहतुकीची सेवा कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. तर परभणी बंद मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेंडॉल उभारण्यात आला आहे. या पेंडॉल परिसरात अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती आहे दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहरातील…
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथील व्यापाऱ्यांनी जम्मू-काश्मीर राज्यातील पर्यटनस्थळ पहेलगाम या ठिकाणी हिंदू बांधवावर अतिरेक्यांनी बेछूट गोळ्या झाडून 27 लोकांचा जीव घेऊन काही जणांना गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती देशभरात समाज माध्यमावरून लोकांना समजली. त्यात पेठ शिवणी येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 24 एप्रिल गुरुवार रोजी या घटनेच्या निषेधार्थ स्वयं स्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे पेठ शिवणी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान सकाळी 11 वाजता सर्व व्यापारी बांधव एकत्र येऊन अतिरेकी भ्याड हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या हिंदू बांधवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. पेठशिवणी बाजारपेठ बंद असल्याची माहिती समजताच पालम पोलीस ठाण्याचे…