परभणी, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दि. ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बीएलओंना मागील आठवडाभरापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यावेळी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह चव्हाण तसेच जनसंपर्क अधिकारी गणेश शिंदे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, एसआयआरचा मुख्य उद्देश पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे आणि अपात्र मतदारांची नावे…
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : वाढते ताण-तणाव, नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेता समाजाला प्रशिक्षित व संवेदनशील समुपदेशकांची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीज परभणी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बी.के. अर्चना दीदी यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू), नाशिक तथा राजयोग एज्युकेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन (शिक्षा प्रभाग), माऊंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘अँडव्हान्स डिप्लोमा इन कौन्सिलिंग अॅन्ड मानसिक आरोग्य’ या शिक्षणक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा ब्रह्माकुमारीज, ओम निवास, वसमत रोड, परभणी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.के. अर्चना दीदी होत्या. यावेळी बी.के. सीमा दीदी, प्रा. बी.के. विकास एल. साळुंखे, डॉ. जगदीश नाईक, विजय…
परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र हा उद्देश साध्य व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांसाठी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 24 जून 2026 रोजी हा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व खाद्य व्यावसायिकांना त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी, केटरिंग आस्थापना तसेच इतर सर्व खाद्य व्यवसायांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायस्थळी…
मुंबई, – : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरण सेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या चरणसेवेला प्रारंभ झाला आहे. त्यात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि आरोग्य जनजागृतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. *चरण सेवेकरिता समन्वय* वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘चरण सेवा’ उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या…
परभणी, (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील सुपुत्र आणि पुण्याच्या उरळी देवाची येथील ‘कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ चे प्राचार्य प्रा. डॉ. संदीप उद्धवराव कदम यांना प्रतिष्ठित ‘टाइम्स पावर ब्रँड २०२६’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित या शानदार सोहळ्यात, उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ‘अग्रगण्य प्राचार्य’ या कॅटेगरीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते अरबाज खान यांच्या शुभहस्ते डॉ.संदीप कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. *ग्रामीण भागातून यशाचे शिखर…* डॉ. संदीप…
परभणी,(प्रतिनिधी) पत्रकारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने तीव्र निषेध केला असून संबंधित इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभारी जिल्हाधिकारी नतिषा माथुर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने सोमवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध केला.मुंबईत बातमीचे वृत्तांकन करत असताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुक्त व निर्भय पत्रकारितेवर गदा येत…
परभणी, ( प्रतिनिधी) जिंतूर तालुक्यातील मौजे कसर येथे कृषी विभागाच्यावतीने बीबीएफ (ब्रॉड बेड फरो–रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक आज घेण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या पद्धतीमुळे अतिवृष्टीच्या काळात शेतातील पाण्याचा योग्य निचरा होतो, तर कमी पाऊस झाल्यास जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन सोयाबीन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून…
परभणी 🙁 प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणी महानगराच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ श्री शिवाजी महाविद्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “पेपरफुटीला संरक्षण देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!”, “टीईटी पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करा!”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी अभाविपच्या महानगर मंत्री गायत्री लाड यांनी सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटीमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागणे हे राज्याच्या परीक्षा व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या भविष्याशी असा खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात…
परभणी, (प्रतिनिधी): ग्राम सडक योजना टप्पा–२ (TWT) अंतर्गत रोहिला पिंपरी ते कसर या महत्त्वपूर्ण सिमेंट रस्ता विकासकामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याचे महत्त्व अधोरेखित करताना पालकमंत्री यांनी सांगितले की, या कामामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षण, आरोग्य, शेती व व्यापार क्षेत्राला चालना मिळेल. मजबूत आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असून या रस्त्यामुळे स्थानिक विकासाला नवी गती मिळेल. गावांच्या सर्वांगीण प्रगतीसह ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी…
परभणी, (प्रतिनिधी): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिंतूर तालुक्यातील कसर येथे आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन करत, कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असे सांगितले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. गावागावांत लसीकरण केंद्रांसह फिरत्या पथकांद्वारेही बालकांपर्यंत लस पोहोचविण्यात येत आहे. यावेळी उपस्थितांनी…

