परभणी (प्रतिनिधी) रस्काराने जबाबदारीची जाणीव होते. माणूस अधिक सक्षमपणे कार्य करू लागतो. सुभेदार बंधू पुरस्कार हा शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांसाठी ऊर्जावान आणि प्रेरणादायी असाच आहे. नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या जडणंघडणीत स्व.रावसाहेब जामकर साहेबांना स्व.राजाभाऊ आणि ॲड.बाळासाहेब सुभेदार या बंधुव्दयांची दमदार साथ लाभली.आज ही हा आदर्श वारसा आमची पीढी आणि आमच्या नंतरची पीढी समर्थपणे चालवत आहे. सुभेदार परिवाराचे स्वागत करत अध्यक्षिय समारोपात विजयसिंह जामकर यांनी पुरस्काराचे मानकरी यांना शुभेच्छा दिल्या.
नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी आणि सुभेदार परिवाराच्या वतीने आयोजित स्व.सुभेदार बंधू उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विजयसिंह जामकर बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांची उपस्थिती होती. प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष डॉ.अभयराव सुभेदार, संचालक,सौ.दिपलक्ष्मीताई जामकर, सदस्य
सौ. सोनियाताई जामकर, सौ.मुग्धाताई सुभेदार, सौ.मृणालताई सुभेदार ,सौ.नेहाताई सुभेदार, सचिव विजयसिंह जामकर, संचालक मंगेशकराव सुभेदार, गोविंदराव नांदापूरकर , हर्षलभैय्या सुभेदार, शंतनुभैय्या सुभेदार ,सुकन्या आरोही सुभेदार, प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, प्रभारी प्राचार्य डॉ.संगीता आवचार , प्राचार्य आर.के.चव्हाण,प्रभारी प्राचार्य मनोहर पुरी, मुख्याध्यापक जी.एन.शिदें , मुख्याध्यापक सौ.जयश्री हत्तीअंबीरे, मुख्याध्यापक अर्जून कच्छवे आदींची उपस्थिती होती.
स्व.राजाभाऊ सुभेदार ,स्व ॲड.बाळासाहेब सुभेदार,
स्व.कमलताई जामकर यांचे प्रतिमा पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. शारदास्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता आवचार यांनी केले.या वेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
गुणीजनांचा गुण गौरव व्हावा या हेतूने स्व.सुभेदार बंधु पुरस्कार प्रदान करताना तुम्हा सर्वांकडून अधिक चांगले कार्य घडावे या साठीची प्रेरणा देणारा हा सोहळा ठरावा असा आशावाद प्रसंगी ॲड.किरणराव सुभेदार
यांनी व्यक्त केला.
मान्यवरांचे हस्ते स्व.सुभेदार बंधु उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.महेश शिवाजीराव जाधव ,कै.रावसाहेब जामकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक शिवाजी किशनराव लोडे, नूतन विद्या मंदिर मुला- मुलींच्या हायस्कूल चे सहशिक्षक केशव विश्वंभर बोराडे यांना प्रदान करण्यात उत्कृष्ट विद्यार्थी रोहन प्रवीण रुघे वर्ग 9 वा.तसेच शिक्षकेतर कर्मचारी हेमंत भरतराव संघई
ग्रंथपाल,कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर रोड,परभणी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ठ विद्यार्थी रहिम मोहम्मद गौस शेख वर्ग 10 वा.याला गौरविण्यात आले.यावेळी शिवाजी लोडे ,प्रा.डॉ.महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वारातीम विद्यापीठ नांदेड च्या वतीने के के एम कॉलेज मानवत येथे आयोजित परभणी जिल्हास्तरीय संशोधन महोत्सव 2025 मध्ये कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय ,परभणी कु.शितल राजेश नंद प्रथम, संस्कृती स्वप्निल पदमावार व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ.ओमप्रभा लोहकरे , डॉ पंकज अबोटी , डॉ.गणेश जाधव , प्रा.निकिता कुलकर्णी,प्रा.कांचन शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.शेवटी उपस्थितांनी स्व.सुभेदार बंधुंना भावपूर्ण पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करुन प्रा.अरुण पडघन यांनी आभार मानले.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


