परभणी(प्रतिनिधी) : मध्यवस्तीतील वडगल्लीतील ज्येष्ठ नागरिक श्रीमती विमलबाई जनार्धनराव शहाणे यांचे सोमवार 14 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात शंकर, गजानन ही दोन मुले, सौ. सिंधू, सौ. सुनीता या दोन मुली, सौ. सुरेखा, सौ. योगिता या दोन सूना, नातू डॉ. मयूर, शिवम, वैष्णवी, कृष्णा, ऋतूजा, डॉ. प्रतिक्षा, स्वरा असा मोठा परिवार आहे. श्रीमती शहाणे यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी 12 वाजता येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, क्रिडा शिक्षक शंकर शहाणे यांच्या त्या मातोश्री होत.
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी)येथील ज्ञानोपासक महाविद्यालय आणि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब ऍड. गणेशरावजी दुधगावकर होते,बोलताना ते म्हणाले जातीयता नष्ट झाल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं त्यामुळे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल. महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशान्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मार्गदर्शन,जय भीम पदयात्रा, महात्मा फुले यांना अभिवादन, समतादुताच्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती योजनेचे मार्गदर्शन आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें होते. याप्रसंगी…
परभणी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, प्रतिष्ठान, संघटनांद्वारे सोमवार 14 एप्रिल रोजी अभिवादनासह अन्य भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास शेकडो मान्यवरांसह हजारो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गेल्या चार-सहा दिवसांपासून या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील विविध भागातील संस्था, संघटना, प्रतिष्ठानांद्वारे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे नियोजन तसेच वातावरण निर्मितीसुध्दा करण्यात आली . विशेषतः मुख्य रस्ते, मुख्य चौकांमधून निळे झेंडे, छोट्या मोठ्या आकाराचे, विविध आशयांचे होर्डिंग्ज उभारल्या गेले . हे होर्डींग लक्षवेधी ठरले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात महापालिका…
परभणी (प्रतिनिधी) आज भगवान महावीर यांच्या 2624 व्या जन्म कल्याणक दिनानिमित्त सकल जैन समाज परभणी तर्फे आज परभणी शहरामध्ये सर्व जैन मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सकाळी सात वाजता आनंद नगर जैन मंदिर इथून शोभा यात्रेला सुरुवात झाली तेथून सुभाष रोड जैन मंदिर भजन गल्ली जैन मंदिर पोलीस कॉर्टर नानलपेठ मार्गे गांधी पार्क नारायण चाळ मार्गे गांधी पार्कमध्ये शोभायात्रेचा स्तंभ पूजन करून समारोप झाला यावेळी सकल जैन समाजातील हजारो पुरुष महिला उपस्थित होते याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम झाले लहान मुलांच्या नाटिका डान्स वक्तृत्व झाले यावेळी जैन समाजातील माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही समाजाला प्रबोधन…
परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशान्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे प्राचार्य डॉ.शेख बाबर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या सप्ताहाच्या माध्यमातून जय भीम पदयात्रा, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्यावर वक्तृत्व स्पर्धा, समतादूताच्या माध्यमातून मार्गदर्शन, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन आणि भीम जयंतीच्या दिनी बाबासाहेबांना अभिवादन करून समारोप होणार आहे. उद्घाटनाच्या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र.कुलगुरु डॉ.अशोक महाजन, प्राचार्य बी. यू.जाधव, विद्यापीठाच्या प्राधिकरणातील डॉ. चौधरी, अशोक गुजराती यांनी भेट दिली.या कार्यक्रमाला उपप्राचार्य विजय घोडके,डॉ.पी.एस.वक्ते, सर्व विभागाचे विभाग प्रमुख…
परभणी,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अस्तित्वात असणार्या जुन्या भूस्रोतांच्या बळकटीकरणासाठी संबंधित यंत्रणा, जिल्हा नियोजन आणि सीएसआर फंडाच्या माध्यमातून आपण गतिशील प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. येणार्या पावसाळ्यात पाण्याची स्थिती उत्तम रहावी यासाठी याच उन्हाळ्यात जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. शंकर आजेगावकर यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांची भेट घेवून चर्चा केली. तसेच आपल्या मागणी संदर्भातील एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल कंपायलेशन ऑन डायनामिक ग्राउंड वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया’ यांच्या अहवालानुसार भूजलाच्या अमर्याद्वापरामुळे जमिनीखालील पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर होत आहे. परभणी जिल्हा हा गोदावरी खोर्यातील…
परभणी (प्रतिनिधी) परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलमधील नवजात अतिदक्षता विभागाने एका चमत्कारिक यशाला गवसणी घातली आहे. सातव्या महिन्यात जन्मलेल्या एका लहान अर्भकाला गंभीर आजारांवर उपचार करून त्याला नवजीवन बहाल करण्यात आले आहे.त्यामुळे आर.पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल या अर्भकाला फुफ्फुसात रक्तस्त्राव, आतड्यांमध्ये पू आणि जीवाणू संसर्ग, शरीरातील ऑक्सिजन वाहक क्षमता कमी होणे तसेच काविळ या गंभीर आजारांनी ग्रासले होते. सदरील अर्भकाचे वजन फक्त 900 ग्रॅम इतके होते. या लहान अर्भकावर तब्बल 72 दिवस उपचार करण्यात आले. नवजात अतिदक्षता विभागातील बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब गायकवाड, तसेच डॉ.इरफान शेख,डॉ.शीतल रेंगे, डॉ.अरबाज शेख…
पालम (प्रतिनिधी) सोमवारी 7 एप्रिल रोजी परभणी जिल्हयात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई देणे बाबत..पालम तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले, परभणी जिल्हयात बऱ्याच सर्वदूर भागात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस काही प्रमाणात गारपीट यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे गहू, ज्वारी, करडई, फळबागा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचनामे करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. अशी मागणी किसान…
परभणी(प्रतिनिधी) जेष्ठ नागरिक श्रीमती कलावतीबाई माणिकराव बेंबळकर यांचे आज दुपारी 4 वाजता माणिक-कला निवास कल्याण नगर येथे वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लिंगायत स्मशानभूमी खंडोबा बाजार परभणी येथे होणार आहे. संजय बेंबळकर यांचा त्या आई होत. त्यांचा पश्चात शिवा, सुनील, सतीश ही मुल व मुलगी मीना भडंगे असा परिवार आहे.
पालम (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्याि दष्टीलने व केंद्र सरकारच्यार व राज्यम सरकार यांच्याम योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याासाठी मा.पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पानेतून “पालकमंत्री टास्क फोर्स“ तयार करण्यादत आला आहे. त्याहअनुंषगाने पहील्या् टप्याूनकगत या टास्क秀 फोर्स अंतर्गत पालम तालुक्याातील एकुण 08 गावे समावेश करण्यावत आलेला असून प्रत्येषक गावांना तालुकास्तमरीय एक पालक अधिकारी यांची नेमणुक करण्यासत आलेली आहे. अनुक्रमे गांवाची नावे व पालक अधिकारी शेखराजूर- कैलासचंद्र वाघमारे तहससिलदार पालम, लाडंकवाडी – उदयसिंग शिसोदे गट विकास अधिेकारी पंचायत समिती पालम,खडी – आबासाहेब देशमुख तालुका कषि अधिकारी पालम , धनेवाडी – आशीतोष चिंचालकर मुख्यापधिकारी नगर पंचायत पालम, खोरस- राजेश्वार पवळे नायब तहसिलदार महसूल 2, पेठशिवणी-…