परभणी, (प्रतिनिधी) : योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे. या संदेशाचा प्रसार करत प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे १२ वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, योग साधक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामूहिक योगासने करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प केला. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, महानगरपालिका, मेरा युवा भारत आणि जागतिक योग उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या जागतिक योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी असून त्यानुसार योगाचे आरोग्यदायी…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांचा पक्ष असलेली शिवसेना सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. शिवसेनेने रस्त्यावरच्या अनेक लोकांना मोठा केलं.ते लोक निघून जात आहेत. कुणी कुठे गेले तरी शिवसेनेला आणि सामान्य शिवसैनिकाला काही फरक पडणार नाही, आपण एकसंघ राहून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं, आपण आपली ताकद दाखवून द्यायची असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या शनिवारी परभणीत मुक्कामी येणार आहेत. रविवार दिनांक 28 जून रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. यानिमित्त रविवार दिनांक 21जून रोजी आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी…
परभणी (प्रतिनिधी) मानवत तालुक्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या सभागृहाचे छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर परभणी येथील आर.पी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आ.डॉ.राहुल पाटील यांनी आरपी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्म उपस्थित होते त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिला. दुर्घटनेतील जखमींना आवश्यक ते सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल तसेच पीडितांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार…
परभणी, ( प्रतिनिधी ) शनिवारी श्रद्धेने, भक्तिभावाने आणि मनोमन प्रार्थना करण्यासाठी यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आलेल्या भाविकांवर काळाने अचानक घाला घातला. दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी उभारण्यात आलेला सभामंडप अचानक कोसळला आणि काही क्षणांतच आनंद, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण आक्रोश, धावपळ आणि अश्रूंमध्ये बदलले. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुती मंदिर हे पंचक्रोशीत श्रद्धेचे केंद्र मानले जाते. प्रत्येक शनिवारी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. आजही शेकडो भाविक हनुमंताच्या दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या भव्य छत आणि सभामंडपाचे बांधकाम…
परभणी ( प्रतिनिधी) यशवाडी येथे आज झालेली दुर्घटना या अत्यंत दुर्देवी असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या जखमी असलेल्या सर्व भाविकांवर विचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तसेच मृत्युमुखी पडलेल्या भाविकाच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. प्रशासनात जखमीचे सर्वतोपरी उपचाराची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे
परभणी ( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेले यशवाडी येथील मंदिराचा सभामंडप कोसळून झालेली दुर्घटना या अत्यंत दुर्दैवी असून प्रशासन स्तरावर लागणारे सर्व मदत देण्याचे सांगण्यात आल्याची खासदार संजय जाधव यांनी सांगितले ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांच्या कुटुंबात दुःखात मी सहभागी आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी माझे बोलणे झाले असून शासन स्तरावर लागणारे सर्व मदत देण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे असे संजय जाधव यांनी सांगितले.
परभणी, (प्रतिनिधी): मानवत तालुक्यातील यशवाडी येथे मंदिराचा गाभारा कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बचाव आणि मदतकार्याला गती देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. दुर्घटनेनंतर महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून जखमींच्या उपचारांची माहिती घेतली तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. बचावकार्यादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. ***
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविक दगावले आहेत. तर अन्य काही भावीक जखमी झाले आहेत. मृत्यूचा आकडा अद्याप समोर नसून आला नसून अनेक जण ढिकाऱ्याखाली गाडले गेले असल्याचे शक्यता आहे या मंदिराच्या गाभार्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. या गाभार्याच्या बांधकामात दगडांचा वापर होत होता. आज शनिवार रोजी या मंदिरात भाविकांची दर्शनाकरीता मोठी गर्दी उसळली. त्यावेळी गाभार्याचा काहीसा भाग विशेषतः दगड कोसळून काही भावीक दबून मृत्यू पावले. मृत्यू पावलेल्या भाविकांची संख्या चार किंवा त्यापेक्षा अधिक असावी असा अंदाज आहे. अधिक तपशील कळू शकला नाही. बचाव कार्य युद्ध पातळीवर चालू…
परभणी,(प्रतिनिधी) : उबाठा गटाची उपनेते तथा विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी बुधवारी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटाशी सलगी केली. गेल्या वर्षभरापासून खासदार जाधव यांनी या ना त्या कारणाने पक्षश्रेष्ठींच्या विरोधात सातत्याने तक्रारींचा सूर आळवला होता. विशेषतः संघटनात्मक नियुक्त्यांसह बांधणीत श्रेष्ठी विश्वासात घेत नाहीत, असे नमूद करीत शहरप्रमुखांपासून जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्यात समर्थकांना डावलल्याबद्दल खुलेआमपणे व सातत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार व्यक्त केलेल्या नाराजीबाबत श्रेष्ठींनीही दुर्लक्षपणाची भूमिका घेतली. त्यानंतर खा. जाधव यांनी श्रेष्ठींवर जोरदारपणे टीका टिप्पणी सुरु केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर हेलपाटे मारुनसुध्दा भेट होत नाही. ठाकरे कुटूंबियांभोवतीचा कोंडवाळा खासदारांनासुध्दा भेटू देत…
परभणी,( प्रतिनिधी) ) : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान तहसील कार्यालय परभणी, तहसील कार्यालय सेलू, उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड आणि तहसील कार्यालय पाथरी येथे मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार मतदान केंद्रांच्या ठिकाणांपासून १०० मीटर परिसराच्या आतील सर्व पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, फेरीवाले, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने तसेच पक्ष किंवा उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच निवडणूक…

