पालम ((प्रतिनिधी) गावातील वाचनालये हे असतात. युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अशा वाचनालयांना अत्याधुनिक सुविधा देत समृद्ध केलं तर ग्रामीण भागातील बौद्धिक स्तर उंचावेल. तुटपुंज्या अनुदानावर चालणाऱ्या या वाचनालयांच्या वाढीव अनुदानासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दि.२३ केले.
पालम तालुक्यातील चाटोरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाचे आयोजन कोनेरवाडी येथील श्री बसवेश्वर सार्वजनिक वाचनाल याच्या वतीने केले होते. यावेळी कार्यक्रमाचे
अध्यक्ष प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते. मंचावर माजी आमदार गंगाधर पटणे,कृषिभूषण कांतराव देशमुख,डॉ.विवेक नावंदर, बाळासाहेब राखे,विष्णू मुरकुटे,डॉ.सुभाष चव्हाण, डॉ.सुनील हुसे, इंजि. नारायण चौधरी,खंडेराव सरनाईक,बाळासाहेब देखने, जीवन लोखंडे, अनिल बाविस्कर,प्रा. विलास वैद्य, नरहरी ढगे, गुलाबराव मगर,राम मेकले, डॉ.निलेश दळवे, बालाजी मोहिते,अध्यक्ष सचिन जोशी, सचिव सुभाष ढगे,कोषाध्यक्ष संदीप किरडे, प्राचार्य दाडू पवार यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना आ.डॉ. पाटील पुढे म्हणाले,अवेळी व तुटपुंजे अनुदान यामुळे ग्रामीण भागातील वाचनालये मोडकळीस आली आहेत. ज्या वाचनालयाच्या माध्यमातून भावी पिढी घडविण्याचे काम होते. याविषयी शासनाची उदासीनता ही मारक आहे. त्यातच शासनाने नवीन वाचनालयांना मान्यता देणे बंद केले आहे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे.
पालम तालुक्यातील चाटोरी येथे ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न झाले. वाचन हे एक उत्तम व्यसन आहे, जो वाचन करतो तो बहुआयामी होतो. त्यामुळे समाज सुशिक्षित, सुसंस्कृत आणि समृद्ध करायचा असेल तर शासनाने वाचनालया विषयीची उदासीनता दूर करून त्यांना समृद्ध करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मनोगतात डॉ.विवेक नावंदर म्हणाले, ग्रामीण भागातील वाचनालयाच्या चळवळीने मोठे रुप धारण केले आहे. ग्रामीण भागात वाचनाची चळवळ वाढविण्याचे
*अधिवेशनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. उदघाटन सत्रात डॉ. सुभाष चव्हाण, प्रा.विलास वैद्य, डॉ. सुनील हुसे यांनी मनोगत व्यक्त केले. दोन सत्रात संपन्न झालेल्या या अधिवेशनात ‘मराठी अभिजात भाषा व सार्वजनिक ग्रंथालय’, कृत्रिम बुद्धिमतेच्या काळात वाचनाचे महत्व’ या विषयाबर शिक्षणाधिकारी प्रा. बिष्ठ्ठल मुसारे, माधव गव्हाणे, कथाकार राजेंद्र गहाळ, डॉ. नामदेव दळवी, विजय गायकवाड, अरबिंद लंके, प्रभाकर कापसे, सुनील बायाळ यांनी आपले मते व्यक्त केली*.
काम वाचनालयांनी केले आहे. शिक्षणाने माणूस साक्षर होतो तर वाचनाने माणूस समृद्ध होतो. या चळवळीला पाठबळ देणे शासनाचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. उदघाटन सत्राच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार म्हणाले, अनेक वर्षापासून वाचनालयांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. पण पूर्ण होत नाहीत. वाचनालये कसे चालवावेत.? असा प्रश्न प्रत्येक वाचनालयाच्या संचालकापुढे निर्माण झाला आहे. वाचनालयात बदल व्हावा,ग्रामीण भागातील लोकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी शासनाने लवकरात लवकर वाचनालयाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी त्यांनी व्यक्त केली.
स्वागतपर भाषण सचिन जोशी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष ढगे यांनी केले. सूत्रसंचालन बॅजयंत बोबडे, ब्रह्मानंद किरडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य दगडू पवार यांनी मानले.