परभणी,(प्रतिनिधी) : पालम तालुक्यातील मौजे फळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (11 जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. साई कैलास पवार (वय 12 वर्षे, रा. रायवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) हा मुलगा आपल्या कुटुंबासह मौजे फळा येथे देवदर्शनासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो गावातील नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कैलास पवार यांनी पालम पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरवरून पालम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास…
Author: Lok Sanchar
“शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट बंद करा; कोचिंग माफियांवर कारवाई करा : सुहास पंडित “* परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश, स्टेशनरी व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच राज्यभरात खाजगी कोचिंग क्लासेसचे वाढते व्यापारीकरण, अवाजवी शुल्क आकारणी आणि विद्यार्थी-पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शाळांकडून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती रोखण्यासाठी तसेच राज्यात स्वतंत्र खाजगी कोचिंग क्लासेस विनियमन कायदा लागू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले…
परभणी, (प्रतिनिधी) : शहरातील मल्हार नगर परिसरातील विवाहित महिला घरातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने तिच्या पतीने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत रोहित शिवाजीराव खुणे (वय २४, रा. मल्हार नगर, परभणी) यांनी दि. ८ जून २०२६ रोजी नानलपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, पत्नी दिव्या रोहित खुणे (वय १९) ही दि. ८ जून रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजण्याच्या सुमारास शिवलेले ब्लाऊज आणण्यासाठी जाते, असे सांगून घरातून निघून गेली. मात्र त्यानंतर ती परत घरी आली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. हरवलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : रंग गोरा, उंची अंदाजे ४ फूट, बांधा सडपातळ, चेहरा…
परभणी, (प्रतिनिधी) — अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नियतकालिक श्रमशक्ति सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) ही दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणे जून २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत परभणी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणांचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या करण्यात आला आहे. भारत सरकारतर्फे नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्राची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती संकलित केली जाते. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य शासन विविध विकासात्मक…
*निवडणूक निरीक्षक व जिल्हाधिकारी यांनी केले मार्गदर्शन* परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेची परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक निरिक्षक रूचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, हिंगोली निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार उपस्थित होते. निवडणूक निरक्षिक श्री. जयवंशी म्हणाले की, मतदान व मतमोजणीच्या दिवशी सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे किंवा नाही यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुक्ष्म निरीक्षकांवर आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी नियमाचा भंग होत…
परभणी, (प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील मौजे टाकळी (कुं) येथील सन १९९० पासून प्रलंबित असलेली प्लॉट फेरफार प्रकरणे अखेर निकाली काढण्यात आली. तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला न्याय मिळाल्याने ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी चर्चा केली. प्रलंबित फेरफार प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी विशेष बैठक घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून कार्यवाही सुरू केली. तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, ग्राम महसूल अधिकारी सोपान गुट्टे आणि मंडळ अधिकारी ज्योती…
परभणी, (प्रतिनिधी) — महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, परभणी यांच्या वतीने वार्षिक क्रेडिट प्लॅन 2026-27 कार्यशाळेचे आयोजन हॉटेल विसावा, स्टेशन रोड, परभणी येथे करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र अकुलवार व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रांजल गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय सल्लागार संदीप मराठे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार उत्कर्ष श्री.भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी, वित्तीय संस्था व महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये पीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुरुंदकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक मकरंद सरकटे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विनय सावंत, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक महेश चव्हाण, एचडीएफसी बँकेचे विभागीय…
परभणी, (प्रतिनिधी) मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार “वरिष्ठ नागरिक सन्मान” योजनेअंतर्गत वृद्धांकरिता जागृती युनिटच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार, त्यांचे संरक्षण, प्रतिष्ठा व न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती शिबिर स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रम येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीचे सचिव भूषण म. काळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील न्यायालयाबाबतची भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नेहमी त्यांच्या सोबत…
परभणी, (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. मात्र, वसतिगृहासाठी अर्ज न करणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहतील. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे हा नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील परीक्षेत…
परभणी : परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणी येथे औषधशास्त्र (फार्माकोलॉजी) विभागामार्फत आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये परभणी मेडिकल कॉलेज, परभणी नर्सिंग कॉलेज आणि परभणी कॉलेज आॅफ फिजिओथेरपी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची चाचणी घेण्याबरोबरच त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती, बौद्धिक क्षमता आणि विविध आरोग्यविषयक शाखांमधील समन्वय वाढविण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. यावेळी अधिष्ठाता व संचालक डॉ. प्रमोद शिंदे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अशा शैक्षणिक व ज्ञानवर्धक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन…

