*निवडणूक निरीक्षक व जिल्हाधिकारी यांनी केले मार्गदर्शन*
परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेची परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक निरिक्षक रूचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, हिंगोली निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार उपस्थित होते.
निवडणूक निरक्षिक श्री. जयवंशी म्हणाले की, मतदान व मतमोजणीच्या दिवशी सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे किंवा नाही यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुक्ष्म निरीक्षकांवर आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी नियमाचा भंग होत असल्यास तात्काळ ही बाब निवडणूक निरीक्षकाच्या लक्षात आणुन देणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी निवडणूक मतदान व मतमोजणीची प्रक्रीया उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना सविस्तरपणे सांगितली.
यावेळी श्रीमती ढालकरी आणि श्रीमती संगेवार यांनी सादरीकरणाद्वारे मतदान व मतमोजणीची प्रक्रीया उपस्थितांना सांगितली. यावेळी प्रशिक्षणास मतदान व मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*-*-*-*-*


