परभणी,(प्रतिनिधी) : पालम तालुक्यातील मौजे फळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (11 जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
साई कैलास पवार (वय 12 वर्षे, रा. रायवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) हा मुलगा आपल्या कुटुंबासह मौजे फळा येथे देवदर्शनासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो गावातील नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती कैलास पवार यांनी पालम पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरवरून पालम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश गोविंद यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार गणेश, पोलीस हवालदार विलास कदम हे करीत आहेत.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


