परभणी तालुक्यातील लाभार्थींना उपस्थित राहण्याचे आवाहन
परभणी, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिन व दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जयंती निमीत्य महाराष्ट्र शासनाच्यावतीने परभणी विधानसभा मतदारसंघ अतंर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन दि.२२ जुलै २०२६ रोजी “अश्वमेध” क्रिडा मैदान जवळ “दिक्षांत समारंभ सभागृह” वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथे आयोजीत केले आहे.
सदर शिबीरासाठी महिला बाल विकास विभाग, विभागीय वन अधिकारी कार्यालय, परभणी, शालेय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, भुमी अभिलेख विभाग, महिला बचत गट / महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती घरकुल व ग्रामविकास विभाग, दस्त नोंदणी व मुद्रांक विभाग, कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, संजय गांधी निराधार विभाग तहसिल कार्यालय, परभणी, पुरवठा विभाग तहसिल कार्यालय, परभणी या विभागातील लाभार्थी यांना लाभ वितरीत करणे तसेच शिल्हा शासकीय रुग्णालय, परभणी आरोग्य विभाग पंचायत समीती, आरोग्य विभाग महारनगपालीका परभणी यांचे वतीने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे नागरीकांना आरोग्य विषयक आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच विविध विभागातील योजने संबंधीत विभागाच्या वतीने अर्ज व प्रस्ताव स्विकारण्यात येणार आहेत तरी तालुक्यातील नागरीक यांनी सदर शिबीराचे ठिकाणी उपस्थीत राहून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार संदीप राजपुरे यांनी केले आहे..
***


