परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी आगारासाठी १०० राजमाता जिजाऊ बसची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती त्यातील पहिल्या टप्प्यात ३५ बस उपलब्ध झाल्या आहेत लवकरच उर्वरित बस देखील उपलब्ध होतील. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार अशी माहिती यावेळी आमदार डॉ.पाटील यांनी दिली.
नवीन बससेवेच्या शुभारंभामुळे बसस्थानकासह विविध मार्गांवर नागरिक आणि प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमुळे प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी महापौर सय्यद एकबाल महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, पूर्णा तालुकाप्रमुख छगन मोरे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, नगरसेवक बबलू घागरमाळे, राजेश रणखांबे, विकास राजापुरे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, युवा सेना तालुकाप्रमुख संदीप झाडे, बंडू नाना बिडकर, सुनिल पंढरकर, युवा सेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे, उपशहरप्रमुख संभानाथ काळे, मारोती तिथे, उद्धवराव मोहिते, गणेश सोळंके, सुशील नरसीकर, शुभम हाके, चट्टे, अजित यादव, अजय चव्हाण, हरमोहन सिंग टाक, कैलास पतंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच परिवहन विभागाचे उपविभागीय नियंत्रक सोळंके यांच्यासह गणेश भोसले, रेवनवार, परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या नवीन बससेवेचे स्वागत करत, शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत व्यक्त केले.


