Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी) जायकवाडीच्या जलाशयातून परभणी जिल्ह्यातील टेल पर्यंत पूर्ण क्षमतेने कालव्याद्वारे पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे सोमवारी जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास हजारो कार्यकर्त्यांसह घेराव घालून टाळे ठोकणार आहेत. जायकवाडीच्या जलाशयातून डाव्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे. परंतु हे पाणी परभणी जिल्ह्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. परभणीच्या वरच्या भागातील काही उपद्रवी त्या त्या भागातील तलाव, सिंचन प्रकल्पांतून हे पाणी खेचून घेऊ लागले आहेत. त्याचा परिणाम जायकवाडी कालव्यातील पाणी परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या पुढे सरकेनाशे झाले आहे.यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर लाभ क्षेत्र, हजारो शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. आपण जायकवाडीच्या मुख्य अभियंत्यांना या सर्व गोष्टी निदर्शनास आणून…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  महिला सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. परंतु, असे असले तरी महिलांकडून स्वतःचे आरोग्य मात्र दुर्लक्षित केले जाते. यामुळे महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. महिलांनी स्वतःची शक्ती ओळखून पुढील वाटचाल केल्यास केवळ घरच नव्हे तर देश सुद्धा महिला समर्थपणे चालवू शकतात, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सारिका बडे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी.हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यावतीने रविवारी महिलांसाठी सर्व रोगनिदान तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे, विधीज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी क्षीरसागर, डॉ. संप्रीया पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी मनीषा गोरे यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

परभणी (प्रतिनिधी)छ त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सोमवारी दि.17 सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आज शनिवारी (दि.15) पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी विहिंपचे क्षेत्रीय मंत्री अनंत पांडे, वेदशास्त्रसंपन्न बाळुगुरू असोलेकर, विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, जिल्हामंत्री अ‍ॅड.राजकुमार भांबरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा, गोरक्षाप्रमुख शिवप्रसाद कोरे, शहरमंत्री अभिजित कुलकर्णी हे उपस्थित होते. विहिंपचे जिल्हा मंत्री भांबरे यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी तालुका व जिल्हास्तरावर प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. तर काही ठिकाणी धरणे आंदोलन केले जाईल. परभणीत सोमवारी (दि.17) सकाळी 11.30 वाजता…

Read More

पालम (प्रतिनिधी ) होळी आणि धुलीवंदनच्यापार्श्वभूमीवर पालम शहरासह तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त या सणानिमित्त पालम तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस अधिकारी 5 पोलीस कर्मचारी 30 होमगार्ड 29 यांना बंदोबस्त कामी सतर्क ठेवले आहे. पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शना खाली होळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने विविध ठिकाणचा बंदोबस्त निश्चित करण्यात आला.नागरिकांनी तसेच तरुणाईने होळी, धुलीवंदनचा सण उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी केले. शहर सह तालुक्यासह विविध हद्दीत गस्त आणि अवैध व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात केली आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन धारकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुद्धा…

Read More

जिंतूर (प्रतिनिधी) हरी ओम रुग्णवाहिकेचे मालक संतोष जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शुद्ध जल फिल्टर पाणपोईचे उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सौ मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णांचे नातेवाईक तसेच तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनसाठी शीतल व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध केली. राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते फिल्टर युक्त शीतल पाणपोईचे उद्घाटन प्रसंगी संतोष जाधव यांनी स्वखर्चातून शुद्ध पाणी देऊन एक महत्वाचा निर्णय घेतला. त्याचे आम्ही स्वागत केले. अशा माध्यमातून नागरिकांना शुद्ध व शीतल पाणपोई जागोजागी लावल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल तसेच त्याचे आरोग्य पण चांगले राहील असे म्हणत त्याचे कौतुक केले. मूळ अंबरवाडीचे संतोष जाधव…

Read More

पालम (प्रतिनिधी) अँग्रीस्टॅक हा केंद्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असुन, याव्दारे प्रत्येक शेतक-याला विशिष्ट ओळख क्रमांक (फार्मर आयडी) मिळणार आहे. याची नोंदणी तलाठी, कृषी सहाय्यक, सेतु चालक यांचेकडे चालु असुन, सदर नोंदणी मोफत असल्याने, तालुक्यातील सर्व शेतक-यांनी लवकरात लवकर करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे यांनी केले आहे. तालुक्यात एकुण सुमारे 45000 शेतकरी असुन त्यापैकी आज पावेतो सुमारे 16000 शेतक-यांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे संगणक चालक, सेतु चालक (CSC) यांचे स्तरावर ही नोंदणी चालु आहे. यासाठी स्वतः शेतक-यांनी आपले फक्त आधार कार्ड जायचे आहे. या फार्मर आयडीचा पिक कर्ज, पिक विमा, नैसर्गिक आपती अनुदान, नाफेड खरेदी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) स्वाभिमानी कडून राज्य सरकारने तीन दिवसा पूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची व शक्ती पीठ महामार्गाच्या अधिसूचनेची होळीत जाळुन सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. होळी सण देशातील मुख्यसण म्हणुन ओळखला जातो. त्यात प्रामुख्याने असे म्हणतात दुष्टावर चांगल्याचा विजय असे म्हणतात. त्याच प्रमाणे या सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेली याची हार. या नंतर त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय मागे घेण्यास सुरुवात केली. निवडणुकीत आश्वासन मग त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देणार जसे सोयाबीनला 6000/- रू. प्रति क्विंटल तर कापसाला 9000/- रू. प्रति क्विंटल. संपूर्ण कर्ज मुक्ती. शक्ती पीठ महामार्ग रद्द करणार यान सारखी शेतकरी हिताचे निर्णय घेतले. विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भर भरून मत…

Read More

परभणी /प्रतिनिधी – भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त श्री सत्यसाई सेवा संघटनेच्यावतीने आज पौर्णिमा आडगावकरचा भक्ती गीतांचा कार्यक्रम परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात  मंगळवारी दिनांक  ११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गायिका पौर्णिमा चौधरी- आडगावकर यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रमात एकापेक्षा एक सादर केलेल्या भक्तीगीताना परभणीकरानी टाळ्याव्दारे उत्स्फूर्त प्रतिसादात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. भक्ती संगीताच्या माध्यमातून केलेली उपासना म्हणजे ” नाद उपासना ” भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या कृपाशीर्वादाने भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवा निमित्त श्री सत्यसाई सेवा संघटना परभणी वतीने “मानस भज रे गुरु चरणम्” हा “भक्ती गीतांचा” जिल्हास्तरीय संगीत समारोह सामूहिक साधना  आयोजित करण्यात…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी.हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महिलांसाठी रविवार दि.16 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मोफत सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणी मेडिकल कॉलेज येथे सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे,आता महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज आर.पी. हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महिलांसाठी सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कर्ण तपासणी, रक्तदाब, पल्स तपासणी, सीबीसी तसेच रक्तातील सर्व तपासण्या अस्थिरोग, हाडातील ठिसूळता तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, फिजिओथेरपी या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या तपासणीत…

Read More

परभणी(प्रतिनिधी) सातारा येथील पत्रकार तुषार खरात विरोधात आकसबुध्दीने दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच त्यांची त्वरीत सुटका करण्यात यावी अशी मागणी आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत करण्यात आली. सातारा येथील लई भारी या युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्यावर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी, पाच कोटीची खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून तुषार खरात हे तुरुंगातून बाहेर येवूच नयेत यासाठी ही कारवाई करण्यात आली. त्याच बरोबर या माध्यमातून तमाम पत्रकारांध्ये दशहत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला…

Read More