*परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला* परभणी, (प्रतिनिधी) -महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नात लक्ष घातले असून त्यांनी त्यांच्या परभणी जिल्ह्यापासून एकल महिलांच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सुरुवात केली आहे. सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वेक्षण पूर्ण झाले असून नगरपंचायत,नगरपालिका, महापालिका सर्वेक्षण सुरू आहे. त्याचीही आकडेवारी लवकरच जाहीर होईल. ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात समाविष्ट ३४,७३३ महिला आढळल्या असून त्यापैकी सुमारे ९३ टक्के महिला विधवा आहेत तर ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांचे प्रमाण ५२.२४ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी सुमारे ७३.८३ टक्के महिला निरक्षर असून ५५ टक्क्यांहून अधिक महिला शेतमजुरीवर अवलंबून आहेत.…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) येथील शहरातील राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्ता NH61 हा जातो. या रस्त्यावरील शहरातील बसस्थानक लगतच्या उड्डाणपूलावरील फूटपाथ परभणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक साहेब यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे रस्ता रुंद असल्या कारणाने काढून टाकले आहे. परंतु कित्येक महिन्यांपासून सध्या शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, फूटपाथ काढल्यानंतर उड्डाणपूलावरील रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे आधीपेक्षा सध्याच्या स्थितीत अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे. लवकरात लवकर शहरातील या उड्डाणपूलावरील रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी. यानंतर या रस्त्यावर जेवढे अपघात होतील, त्याला आपल्या सह परभणी जिल्ह्यातील परभणी लोकसभा खासदार, पोलीस अधीक्षक हे सर्वस्वी जबाबदार असतील, असे पॅंथर परिवर्तन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ पानबुडे यांनी…
परभणी( प्रतिनिधी) 5 सप्टेंबर 2025 रोजी बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभव नगर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैभव नगर विभागाचे विभाग प्रमुख प्रदीप रुघे सर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेतील विज्ञान शिक्षक सचिन वानरे उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त वर्ग सहावा जी च्या वर्गशिक्षिका सौ आर. एस. देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर भितीपत्रके तयार केले. तसेच भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांची सुंदर चित्रे रेखाटले. वर्गातील चि. ओजस उखळकर ची श्रेयस राऊत ची अन्वय अवचार खूप प्रचिती चांडक शरयू जाधव कु. आदिती जाधव तसेच आरोही खंदारे यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील…
परभणी (प्रतिनिधी) थोर माणसांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःपेक्षा परंपरेला जास्त महत्त्व देतात. अनेकांच्या त्यागातून परंपरा निर्माण होत असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीने सुद्धा व्यक्ती पूजेपेक्षा परंपरा मोठी मानली आहे असे प्रतिपादन वेदांतरत्न प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांनी केले. ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांच्या 105 व्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील कारेगाव रोडवरील व्यंकटेश मंदिरामध्ये आत्मोन्नती प्रतिष्ठान व संत दासगणू भक्त मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मागील तीस वर्षापासून होणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ कीर्तनकार माधवराव आजेगावकर मधुकरराव बंडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विष्णुसहस्रनाम मंडळाच्या सदस्यांसह भाविकां तर्फे तीन विष्णुसहस्रनामाचे सामूहिक पाठ करण्यात आले. पुढे बोलताना प्रमोद शास्त्री म्हणाले की संतांचे चरित्र सामान्य जीवनासाठी सर्वकाळच…
परभणी (प्रतिनिधी) डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर येथील राज्यस्तरीय अधिवेशनासाठी परभणी जिल्ह्यातून 100 पत्रकार सहभागी होणार असल्याची ग्वाही उपस्थित पत्रकारांनी दिली आहे. परभणी डिजिटल मीडियाच्या वतीने14 सप्टेंबर 25 रोजी छ. संभाजीनगर येथे होणाºाा एक दिवसीय अधिवेशनाच्या पूर्वतयारी निमित्त बैठक संपन्न झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस श्री सुरेश नाईकवाडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभू दीपके उपस्थित होते. यावेळी संघाचे कोषाध्यक्ष मोईन खान, उपाध्यक्ष विठ्ठलराव वडकुते, प्रसिध्दी प्रमुख सुधाकर श्रीखंडे, माणिक शिंदे, आनंद पोहनकर, तैयब पठाण,तसेच जिल्हा व महानगरचे सर्व पदाधिकारी यांचे…
परभणी (प्रतिनिधी )ज्येष्ठ पत्रकार कै. प्रल्हादराव शिंदे (पीजी शिंदे सर) यांची कन्या प्रणिता प्रल्हादराव शिंदे यांचे आज दि 6 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता हृदय विकाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचेवय 46 वर्ष होते . त्यांच्या वर अंत्यसंस्कार उद्या दिनांक 7 रविवारी सकाळी 9 वाजता अयोध्या नगरी स्मजानभूमी छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद करण्यात येईल. प्रमोद,शिंदे, प्रशांत शिंदे यांच्या त्या भगिनी होत्या. दैनिक लोकसंचार परिवार शिंदे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
परभणी, (प्रतिनिधी)ःशहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री कुबरेश्वर धाम येथील पवित्र रुद्राक्षाचे वाटप आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. श्री जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने रुद्राक्ष वाटपासाठी 3 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी टोकन असणाऱ्यांना रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले.चार सप्टेंबरला सायंकाळी यशवाडी संस्थानचे महंत श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील,शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक अंबिका डहाळे,संजय गाडगे,श्री जय हिंद गणेश मंडळाचे प्रेरणास्थान अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार,बाळराजे तळेकर,प्रमोद…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नानलपेठ येथे शिक्षक दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते. मंचावर प्रशालेचे उप मुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, प्रशालेतील ज्येष्ठशिक्षक ज्ञानेश्वर पंडित, समुपदेशक प्रवीण सोनोने आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुभाष ढगे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सर्व शिक्षकवृंदाना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सुभाष ढगे म्हणाले की, *शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार…
परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. या जाहीर प्रभाग रचनेत फारसे बदल नाहीत. काही प्रभागाच्या व्याप्ती आणि सीमा रेषेत अंशतः बदल आहेत. उर्वरित बहुतांशी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहे. पालिका मुख्यालय, नटराज रंग मंदिर व कल्याण मंडपम येथील समिती कार्यालयात प्रभाग रचना. आज नकाशासह झळकावण्यात आली. ती रचना कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वेबसाईट https://pcmcparbhani.org/ वर देखील प्रारूप प्रभागाचे नकाशे पहावयास उपलब्ध असणार आहेत. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचने वरती हरकती व सूचना घेण्याकरिता 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे. सदर हरकती या प्रभाग समिती कार्यालय, तसेच मनपा मुख्यालयातील निवडणुक…
पावसाळ्यातील अडथळे पार करून 5 हजार 400 फूट उंचीवर फडकावला तिरंगा परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर परभणी जिल्ह्यातील पाच महिलांनी ऐतिहासिक यश मिळवले आहे. शनिवार 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या मोहिमेत अवघ्या साडेतीन तासांच्या कठीण प्रयत्नानंतर 5 हजार 400 फूट उंचीवर असलेले हे शिखर त्यांनी सर केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बारी गावाच्या हद्दीत वसलेले कळसुबाई शिखर हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न मानले जाते. पाथरीसह जिल्ह्यातील ज्योत्सना पौळ, रुक्मिणी जाधव, किरण धर्मे, रंजना जाधव आणि रोहिणी दिगे या पाच महिला गिर्यारोहकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पावसाळ्यात ओलसर वाटा, निसरडे दगड, चिखल आणि सतत…

