Author: Lok Sanchar

परभणी(प्रतिनिधी)  परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या समयसूचकतेमुळे आणि कुशलतेमुळे एका सात वर्षीय बालकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. एका सात फूट खोल गटारात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला नवे आयुष्य देण्यात आले. परभणी शहरात एका भागात एक सात वर्षीय बालक सात फूट खोल गटारात पडला. तब्बल तीन तास बेशुद्ध अवस्थेत गटारात अडकलेला हा बालक त्याच्या आई-वडिलांना आढळला. त्याला तात्काळ आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बालकाच्या छातीत गंभीर दुखापत झाल्याचे आणि त्याच्या शरीरात हवा भरल्याचे आढळून आले. याशिवाय, गटारातील दूषित पाणी त्याच्या शरीरात गेल्याने तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आर.पी.…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जय हिंद गणेश मंडळाच्या मंडपाचे भूमिपूजन आ.डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या गणेश मंडळाला २३ वर्षांची परंपरा असून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन या गणेश मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते. शहरातील प्रमुख गणेश मंडळांत या गणेश मंडळाचा समावेश आहे या भुमिपूजन प्रसंगी जय हिंद गणेश मंडळाचे प्रेरणास्थान अनिल डहाळे, संग्राम जामकर, अरविंद देशमुख, दिनेश अग्रवाल, प्रमोद(पमू सेठ)सोनी,शंकर देशमुख,सतीश झरकर, बापू तावडे, ज्ञानेश्वर पवार, सुशील कांबळे, बंडू पैलवान, बाळराजे तळेकर, गौतम कुचेरिया, राहुल खटिंग, बबन कल्याणकर,गणेश मुळे,गोविंद इक्कर, अनिल दहीवाळ, मंडळाचे प्रमुख विशू डहाळे,अमित पाचलिंग, गजानन शहाणे, विशाल डहाळे, सुरज सोळंके, शेखर दशरथे,…

Read More

परभणी(प्रतिनिधी) शहरात मानव विकासातील प्रसिद्ध तज्ज्ञ निवृत्त प्राध्यापक विशाला पटनम यांच्या आदरणीय मार्गदर्शनाखाली बाल आणि प्रौढ कन्सल्टिंगने मुलांच्या आणि प्रौढांच्या वाढीच्या गुणांक मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सहभागींना मुले आणि प्रौढ दोघांच्याही शारीरिक वाढीच्या गुणांकाचे मूल्यांकन करण्यासाठी ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्यांनी सुसज्ज करणे, तसेच त्याचे व्यापक आरोग्य आणि उद्योजकीय फायदे अधोरेखित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. या वेळी प्रा. पटनम यांनी कुपोषण आणि वाढ मंदता रोखणेः जीवनाच्या सुरुवातीच्या काळात शारीरिक विकासाच्या समस्या ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी समुदायांना सक्षम आदी बाबत मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले। तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण…

Read More

परभणी : (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ४६५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. परभणी महानगर अंतर्गत कौस्तुभ मंगल कार्यालय, परभणी (चिंतामणी मंदिर मंडळ), मारुती मंदिर, असोला (परभणी ग्रामीण मंडळ) देशपांडे हॉस्पिटल, क्रांती चौक, परभणी (खंडोबा मंदिर मंडळ) ज्ञानेश्वर माऊली मंदिर, विद्यानगर, परभणी (पारदेश्वर मंदिर मंडळ) खंडोबा मंदिर, खंडोबा बाजार, परभणी (खंडोबा मंदिर मंडळ) उड्डाणपूल खाली, भीमनगर, परभणी (रोकड हनुमान मंदिर मंडळ) झरी, सरकारी दवाखान्याच्या बाजूस (परभणी ग्रामीण मंडळ) अशा ७ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात…

Read More

परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थी दशेत मुलांनी मोठे ध्येय प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगून प्रामाणिकपणे अभ्यास करणे आवश्यक आहे मनापासून ठरवलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असून तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावरच ध्येयप्राप्ती शक्य आहे असे प्रतिपादन बालविकास शास्त्रज्ञ प्रा.विशाला पटनम यांनी वसंत आश्रम शाळा कारेगाव येथे आयोजित बाल विकास कार्यशाळेत केले.. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका गीता लेडे, प्रमुख अतिथी मुख्याध्यापक परसराम जाधव, उपस्थित होते.. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रा पटनम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मोलाचे असे मार्गदर्शन केले.. विद्यार्थ्यांचा iq लेवल टेस्ट करण्याची प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यावेळी विष्णू मोपकर,संजय इंगळे, श्रीकांत काळे l, प्रकाश राठोड,अंबादास रेडेवाड,सुनील कच्छवे, राजेंद्र जुनघरे, मोतीराम कराळे, विश्वनाथ खिराडे, उपस्थित होते……

Read More

पुणे, (प्रतिनिधी) : गेल्या ३० ते ४० वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रचंड बदलामुळे जीवन गुंतागुंतीचे झाले असून मानवी जीवन गोंधळलेल्या अवस्थेत आहे, अशा वेळी भारतीय संतांसह लुईस हे आणि ‘सिक्रेट’च्या लेखिका रोंडा बर्न यांच्यासारख्या पाश्चिमात्य तत्वज्ञाच्या विचारांचा आढावा घेणारे ‘कोण दाखवीलं वाट’ हे पुस्तक तरुणांना दिशा दाखविणारे आहे, असा विश्वास एम.जी.एम. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केला. अथश्री पेबल्सच्या मल्टी पर्पज सभागृहात झालेल्या स्तंभलेखक श्रीनिवास बेलसरे यांच्या “कोण दाखवील वाट” या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळकर, जेष्ठ पत्रकार…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण २४ तास उभे आहोत. ज्येष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या समस्या तसेच दु:ख मी बघत आहे. शासकीय धोरणात ज्येष्ठांचे स्थान कुठे आहे याचे भान सरकारला आणून देण्यासाठीच आपण विधेयक मांडले असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले. ज्येष्ठांच्या अनेक अडचणींना वाचा फोडण्यासाठी विधानसभेत ज्येष्ठांच्याबाबत विधेयक मांडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आ. डॉ. राहुल पाटील यांचा मंगळवार, दि.२२ जुलै रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, वैधानिक प्रक्रियेतून समाजातील ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. त्यामुळे ज्येष्ठांचा प्रश्न आपण मनावर घेतला आणि याबाबत विधानसभेत चर्चा केली. ज्येष्ठ व्यक्तींना मानधन,…

Read More

पुणे, (प्रतिनिधी) : गेल्या ३० ते ४० वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रचंड बदलामुळे जीवन गुंतागुंतीचे झाले असून मानवी जीवन गोंधळलेल्या अवस्थेत आहे, अशा वेळी भारतीय संतांसह लुईस हे आणि ‘सिक्रेट’च्या लेखिका रोंडा बर्न यांच्यासारख्या पाश्चिमात्य तत्वज्ञाच्या विचारांचा आढावा घेणारे ‘कोण दाखवीलं वाट’ हे पुस्तक तरुणांना दिशा दाखविणारे आहे, असा विश्वास एम.जी.एम. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केला. अथश्री पेबल्सच्या मल्टी पर्पज सभागृहात झालेल्या स्तंभलेखक श्रीनिवास बेलसरे यांच्या “कोण दाखवील वाट” या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळकर, जेष्ठ पत्रकार…

Read More

पालम (प्रतिनिधी)माजी आमदार बच्चू कडू यांनी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा म्हणून 24 जुलै 2025 रोजी पालम शहरांमध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे त्या आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य अशी मागणी करण्यात आली पालम तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसह प्रहार संघटनेशी संलग्न असलेल्या अपंग क्रांती संघटनेच्या वतीने सर्वच घटकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कर्जमाफी सह सर्व शेतीमालाला हमीभाव जाहीर करत त्या हमीभावाने सर्वच शेतीमाल खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ करून शेतकऱ्याचा सातबारा हा कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार बच्चू कडू यांनी जो…

Read More

परभणी,  ः (प्रतिनिधी) आशा स्वयंसेविका या खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातही आरोग्य दूत म्हणून काम करतात त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना, गरोदर मातांना आरोग्यसेवा मिळते त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आपण सतत लढणार असे प्रतिपादन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले. विधानसभेत आशा स्वयंसेविका यांच्या मानधन व इतर समस्या बाबत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आयटक संघटनेच्या वतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार पाटील बोलत होते. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड, राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले राज्य संघटक राधाबाई पांचाळ, जिल्हा सचिव समता कदम, संजीवनी स्वामी, एम.जोगदंड, शिवम पांचाळ, बालिका केदार, आम्रपाली यमगर, अर्चना चोखट, यमुना जाधव, मायवती खंदारे,…

Read More