पालम (प्रतिनिधी)माजी आमदार बच्चू कडू यांनी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा म्हणून 24 जुलै 2025 रोजी पालम शहरांमध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे त्या आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य अशी मागणी करण्यात आली
पालम तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसह प्रहार संघटनेशी संलग्न असलेल्या अपंग क्रांती संघटनेच्या वतीने सर्वच घटकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कर्जमाफी सह सर्व शेतीमालाला हमीभाव जाहीर करत त्या हमीभावाने सर्वच शेतीमाल खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ करून शेतकऱ्याचा सातबारा हा कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार बच्चू कडू यांनी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा म्हणून 24 जुलै 2025 रोजी पालम शहरांमध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे त्या आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य करावे असे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष बळीराम इंगळे, अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पौळ, पत्रकार शिवाजीराव शिंदे, शेतकरी सूर्यभान ढगे, संतोष रोकडे, योगेश पवार, माधवराव फाजगे, आदिनाथ जोशी, यांच्यासह आदी शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते


