परभणी (प्रतिनिधी) अंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आणि नाबार्डच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्त पुणे येथे आयोजित भव्य समारंभात मा. केंद्रीय अर्थराज्यमंत्री मुरलीधरराव मोहोळ यांच्या शुभहस्ते, दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला “Best DCCB Overall Performance” हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश राजेश्वरराव कुरुंदकर आणि मंगेश फुलारी यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला. यावेळी प्रवीण दराडे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य गोवर्धन रावत नाबार्ड मुख्य कार्यकारी संचालक मा दीपक तावरे सहकार आयुक्त वाडेकर अतिरिक्त सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य मा रश्मी दरड मुख्य सरव्यवस्थापक राजेश सुरवसे, सुनील जी नवसारे जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड परभणी एन डी डी बीचे…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन आणि बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक शुक्रवारी (दि. १८) जुलै रोजी पार पडली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै २०२५ ते डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्हयात विविध विषयावर जनजागृती करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याकरीता विविध विभागांनी समन्वयाने कार्य करावे. त्यानुसार या विभागांनी आपले नियोजन करून दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाला वेग द्यावा. बालविवाहाच्या प्रत्येक प्रकरणात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात…
परभणी,(प्रतिनिधी) यशस्विनी महिला मंचच्या वतीने शहरातील श्री मंगल कार्यालय येथे दिनांक 27 जुलै रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत खुली मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती यशस्विनी महिला मंच अध्यक्ष डॉ.संप्रिया राहुल पाटील यांनी दिली. यशस्विनी महिला मंचच्या वतीने सातत्याने महिलांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. आता मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे.यशस्विनी महिला मंचचे सदस्य आणि एक खुला गट अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे.मंचच्या सदस्यांसाठी सहा विजेते घोषित केले जाणार आहेत.पहिल्या आलेल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय अशी पारितोषिक देण्यात येतील आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिक दिली…
परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील सेलू पाथरी ,सोनपेठ अशा महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 548b या महामार्गाचे काम सुरू झाले असून कार्यारंभ आदेश देण्याच्या तारखे पासून दोन वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी आ राजेश विटेकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर दिली देवगाव फाटा ते इंजेगाव या रस्त्याची लांबी ७०.९० कि. मी असून या रस्त्याच्या निविदेमध्ये आर. बी. घोडके इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे त्यांना Letter of Appointment (कार्यारंभ आदेश) देण्यात आले आहेत देवगाव फाटा ते इंजेगाव (लांबी ७०.९० कि. मी) रस्ता पूर्ण करण्याकरिता Letter of Appointment (कार्यारंभ आदेश) दिल्या…
माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा संपन्न परभणी, (प्रतिनिधी): निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर याच कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित मार्गदर्शन सत्र कार्यशाळेत अधिकारी व तज्ञांनी राज्य शासनातर्फे पत्रकारांसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र व पत्रकारीता आणि वृत्तसंकलन-संपादनात शुध्दलेखनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. गावडे पत्रकारांचे कौतुक करताना म्हणाले की, गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमांनी उत्कृष्ट वार्तांकन केल्यामुळे जिल्ह्यात मतांचा टक्का वाढला. लोकशाही शासनप्रणालीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांनी केलेल्या जनजागृतीमुळेच मतदानाचा टक्का वाढल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी…
परभणी (परभणी) परभणी जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा बट्ट्याबोळ उडाला आहे. शेतकरी सहा महिन्यांपासून पैसे भरून कृषी पंपासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतू शासन गोलमोल उत्तर देत आहे अशा शब्दात आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात गुरूवार, दि.१७ जुलै रोजी लक्षवेधीद्वारे आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे आ. डॉ. पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील वीज समस्येबाबत आवाज उठवला. सौर कृषी पंप योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी २५ हजार ९४२ शेतकºयांनी पैसे भरले. शेतकरी कृषी पंपासाठी कार्यालयात चकरा मारत असून शासनाकडून फिरवा फिरवीची उत्तरे दिली जात आहेत. यात शेतकºयांची चूक काय? असा सवाल करत सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या पैशाचे व्याज सरकार देणार का? कृषी…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील संबर येथील ओंकार बन्सीधर गायकवाड यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा परभणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे. 12 जुलै 2025 रोजी रात्री संबर येथील ओंकार गायकवाड यांचे अपहरण करण्यात आले. याबाबत परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 309/2025 अंतर्गत भा.दं.वि. कलम 140 (3), 351 (2)(3)(5), 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्या दिवशी, म्हणजे 13 जुलै रोजी सकाळी मोरेगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. या अपहरत तरुणाचा खून करुन आरोपींनी पोबारा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी तात्काळ बैठकी…
परभणी (प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील पिकांची अवस्था बिकट होत असल्याने पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालवा वरील कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी काल विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या द्वारे केली होती, त्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या सकाळीच कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले होते, त्याप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता विधान भवन कक्षात बैठक झाली, त्यात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी उद्यापासूनच पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालव्या पाणी सोडण्यात यावे , शेतकऱ्यांची पिके जगविण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले त्याप्रमाणे पैठण…
परभणी (प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील उखळद येथील ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगे यांचा खून करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत करताच विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार गंभीर असून यावर तात्काळ शासनाने निवेदन सादर करावे अशा सूचना दिल्या आहेत. परभणी तालुक्यातील उखळद येथील ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगे हे झिरो फाटा येथील हायटेक निवासी विद्यालयात मुलीची टी.सी. आणण्यासाठी गेले असता तेथे त्यांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण या दोघांनी अमानुषपणे मारहाण केली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात पूर्णा पोलीस ठाण्यात संस्थाचालक पती-पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून दोन्ही आरोपी फरार आहेत…
परभणी : उखळद, ता.जि. परभणी येथील स्व. ह.भ.प. भागवताचार्य जगन्नाथ महाराज हेंडगे उर्फ पिंटू महाराज यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असून, संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकणारी आहे. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी आज परभणी शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. घटनेने व्यथित झालेल्या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भारतीय जनता पार्टी परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी पुढाकार घेत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीने कुटुंबाला थोडासा आधार मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. शिवाजी भरोसे यांनी या प्रसंगी सांगितले…

