परभणी,(प्रतिनिधी) अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी अन्नसुरक्षा योजनेतील वंचित लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला परभणी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेची 60 हजार आणि अंतोदय योजनेचे पाच हजार लाभार्थ्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळत नाही याबाबत तक्रार केली असता अन्न व पुरवठा विभागाने खोटी माहिती देत सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार डॉ.पाटील यांनी केला. तहसीलदारांचे पत्र असतानाही पुरवठा विभागाकडून शिलकी इष्टांक दाखवत खोटी माहिती कशी दिली जाते असा प्रश्न सभागृहात करत पुरवठा विभागाला धारेवर धरले. सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात अन्नसुरक्षा…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे परभणीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने रेल्वे स्थानक ते सावली विश्राम गृह बाईक रॅली काढून स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे परभणी रेल्वे स्थानक येथून सावली विश्रामकडे जात असताना बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालम (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संस्थेचे ॲड.उज्वल निकम, ॲड.बी.के.बर्वे आदींची उपस्थिती होती. सदरील पुरस्कार सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी संस्थेच्या वतीने दिला जातो. सचिन जोशी हे मागील वीस वर्षापासून अरुणोदय सेवाभावी संस्थेच्या…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल , नानल पेठ येथे आषाढी एकादशी निमित्ताने *वारी पंढरीची* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल रूख्माई व संतमेळा यांच्या सजीव देखाव्यांनी प्रेक्षकांची मने वेधली. प्रसंगी वारकरी, टाळकरी , मृदंग वादक यांच्यासह टाळ मृदंगाच्या नादात ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषात दिंडी संपन्न झाली. वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या साह्याने पाऊली सादर केली. सदरील कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डाॕ. एन. ए. झरकर , सचिव डॉ. विवेक नावंदर , उपाध्यक्ष ॲड. विलासराव पोहंडूळकर , सदस्या सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर , मुख्याध्यापक अरूण बोराडे , उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार , पर्यवेक्षक प्रदिप रूघे , बळीराम कोपरटकर आदी उपस्थित होते.…
परभणी,(प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त रविवार 6 जूलै रोजी गोपाळ दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मागील 49 वर्षापासून या दिंडीच्या माध्यमातून परभणीत प्रति पंढरपूर साकार होत आहे. या दिंडीमध्ये अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी, वारकरी, संत यांच्या वेषभुषेत सहभागी होतात.यावर्षीही झांजपथक, ढोल ताशा पथक, लेझीम, व विठ्ठल नामाच्या जयघोषात बुधवारी सकाळी ठीक 8 वाजता माळी गल्लीतील हनुमान मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. यावर्षीचे दिंडीचे यजमान श्री व सौ. आंबेकर यांच्या शुभहस्ते पूजन होईल व त्यानंतर दिंडी नारायण चाळ- स्टेशन रोड-गुजरी बाजार -शिवाजी चौक -नानलपेठ येथून -विद्यानगर – माऊली मंदिर या ठिकाणी या दिंडीचा…
परभणी (प्रतिनिधी) येथील कान्हेकर विद्यालय, परभणी.चे मुख्याध्यापक जयंतराव शेषराव कुलकर्णी-भांडेगावकर यांचे गुरुवारी 3 जुलै रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 41 वर्ष होते त्यांच्या वर येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत शुक्रवारी दि 4 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील कामगार विभागातील काही अधिकारी, दलाल व ग्रामसेवक, नगरपालिका, महानगर पालिका मधील काही अधिकारी यांनी संगनमत करीत बांधकाम कंत्राटदारांचे बनावट प्रमाणपत्रे मान्य करत जवळपास 6 ते 7 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे, त्यामुळे त्या रॅकेटची व बनावट प्रमाणपत्रे , लेबर कार्ड यांची उच्चस्तरीय चौकशी करून वंचित राहिलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात यावीत अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी विधानसभेत केली खऱ्याखुऱ्या बांधकाम कामगारांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील गरजू लाभार्थी या योजना पासून वंचित…
सेलू (प्रतिनिधी) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे ‘ शब्दांचं धन ‘ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख पिंपळपानाच्या साथीने उमलतो. मारूती चितमपल्ली यांना उमेदीच्या काळात सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या. त्यांच्या सोबतच्या आठवणींना या पुस्तकातून मारूती चितमपल्ली यांनी उजाळा दिला आहे. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक खेत्री ( वडवणी ) यांनी केले. त्यांनी मारूती चितमपल्ली यांच्या ‘ शब्दांचे धन ‘ या पुस्तकावर स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक’ या मासिक उपक्रमाचे २९ वे पुष्प गुंफले. जंगल, वृक्ष, प्राणी, पक्ष्यांवर निस्सीम प्रेम करणारे मारूती चितमपल्ली यांचे…
कृषिदिनाचे औचित्य साधून केले वृक्षारोपण परभणी ( प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या सभागृहात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थीनी श्रावणी जाधव हिने वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जांभूळ, करंज आणि कडूनिंब यांसारख्या उपयुक्त…
परभणी (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद यांच्या वतीने कृषी दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, रश्मी खांडेकर, मार्गदर्शक म्हणून प्रा. गजानन गडदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, गाढवे सर, दीपा बापट, मेघा देशमुख आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती घोडके…

