परभणी,(प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त रविवार 6 जूलै रोजी गोपाळ दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मागील 49 वर्षापासून या दिंडीच्या माध्यमातून परभणीत प्रति पंढरपूर साकार होत आहे. या दिंडीमध्ये अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी, वारकरी, संत यांच्या वेषभुषेत सहभागी होतात.यावर्षीही झांजपथक, ढोल ताशा पथक, लेझीम, व विठ्ठल नामाच्या जयघोषात बुधवारी सकाळी ठीक 8 वाजता माळी गल्लीतील हनुमान मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. यावर्षीचे दिंडीचे यजमान श्री व सौ. आंबेकर यांच्या शुभहस्ते पूजन होईल व त्यानंतर दिंडी नारायण चाळ- स्टेशन रोड-गुजरी बाजार -शिवाजी चौक -नानलपेठ येथून -विद्यानगर – माऊली मंदिर या ठिकाणी या दिंडीचा समारोप होणार आहे.
या दिंडीत जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच सर्व हिंदू बांधवांनी सहभागी नोंदवावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे अनंत पांडे, जिल्हा मंत्री राजकुमार भामरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा, सुनील रामपूरकर, एस. आर. कुलकर्णी, शिवप्रसाद कोरे, सुरेंद्र शहाणे, प्रल्हादराव कानडे, सूर्यवंशी, गजानन नळगे, गणेश काळबांडे, शहराध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, विनोद लोलगे व प्रचार प्रसिद्धी प्रमुख गोपाळ रोडे यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


