परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने “सेवा ज्योती यात्रा व विकसित भारत संकल्प सभा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय, एमआयडीसी परिसर, परभणी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. सौ. मेघनादीदी बोर्डीकर या प्रमुख वक्त्या तथा मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राबविण्यात येत असलेल्या जनकल्याणकारी योजना, सेवा, सुशासन आणि विकसित भारताच्या संकल्पनेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करण्यात…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आयोजित सोलापूर झोनल बुद्धिबळ स्पर्धेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले. तसेच मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे महाविद्यालयाच्या रितेश राहुल कावूतकर आणि कृष्णा सुनील व्हडगीर यांची मुलांच्या सोलापूर विभागीय संघात, तर कु. कल्पना मेघश्याम पत्की हिची मुलींच्या सोलापूर विभागीय संघात निवड झाली. त्यामुळे महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंना विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या खेळाडूंना…
परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रीगर -1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नऊ तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच पशुधनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्यात येणार…
परभणी, (प्रतिनिधी ) : नवरात्रोत्सव, दुर्गादेवी आगमन-विसर्जन मिरवणुका, दसरा तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परभणी पोलिस प्रशासनाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार दि. 11 ते 21 ऑक्टोबर 2026 दरम्यान पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी परभणी जिल्ह्यासाठी विविध आदेश जारी केले आहेत. यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने होणार असून २० ऑक्टोबर रोजी दसरा तर २१ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी विसर्जन होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, सभा व इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…
परभणी, (प्रतिनिधी) : पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “सेवा, सुशासन अभियान – आंगण का मिलन” या उपक्रमांतर्गत परभणी शहरातील सिद्धार्थ नगर येथील अंगणवाडी क्र. ३० येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. बालकांचे पोषण, आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्या हस्ते सेविकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भाजपा सरचिटणीस सौ. मंगलताई मुदगलकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. मनीषा जाधव, नगरसेविका सौ. सपना जुकटे, सौ. सुशिला थोरात, चिटणीस सौ. रूपाली ठाकरे, सौ. प्रभावती अन्नपुर्वे,…
छत्रपती संभाजीनगर:- ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी ३१ इच्छुक व्यक्तींना एकूण ५९ कोरे नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, आज दुपारी ३ वाजेपर्यंत १० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये श्रीधर नारायण साळवे (भीमसेना), संजीवनी मदन टेकाळे (अपक्ष), नामदेव केरबा वाघमोडे (अपक्ष), अकील अहमद शेख (आम आदमी पार्टी), अॅड. अंबादास जाधव (अपक्ष), अविनाश बंडू गोरे (अपक्ष), पाटील कसारे रमेश विनायकराव (अपक्ष), शेख अब्दुल मलिक अब्दुल खुद्दुस (राष्ट्रीय समाज पक्ष), संजीवनी मदनराव टेकाळे (स्वराज्य निर्माण सेना) आणि कृष्णा त्रिंबकराव पवार (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यालयाच्या नोंदीनुसार या उमेदवारांचे नामनिर्देशन…
परभणी,(प्रतिनिधी) : शेतात बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आल्याने धसाडी परिसरात खळबळ उडाली. दैठणा पोलिसांनी गुरुवारी (दि. 1) सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल 153 किलो गांजा जप्त केला असून, याप्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 76 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दैठणा पोलिसांना धसाडी परिसरात एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सकाळी संबंधित ठिकाणी कारवाई केली. पाहणीदरम्यान गांजाची झाडे आढळून आल्यानंतर पोलिसांनी ती ताब्यात घेत वजन केले असता एकूण 153 किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून,…
परभणी, (प्रतिनिधी)– सेवा संकल्प अभियानांतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र, वडगाव (ता. सोनपेठ) यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा, वडगाव येथे ध्यान व योग शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव केला. नियमित योग आणि ध्यानामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मनाची एकाग्रता, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी वाढण्यास मदत होते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी रुजविणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. **
मुबंई — देशातील सुरक्षित, स्वच्छ आणि किफायतशीर इंधन पर्याय असलेला ‘ऑटो एलपीजी’ उद्योग सध्या गंभीर संकटात सापडला असून तो बंद होण्याच्या मार्गावर आहे. हा उद्योग बंद पडल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर, रोजगारावर आणि पर्यावरणावर अत्यंत वाईट परिणाम होईल, असा इशारा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मंत्रालय सचिव आणि पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युरेटरी बोर्ड ‘च्या अध्यक्षांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ३० हजारांपेक्षा जास्त रोजगारांवर गदा आणि हजारो कोटींचे नुकसान नितीन सोळंके यांनी पत्रात नमूद केलेल्या अभ्यासानुसार, सध्या देशात सुमारे १,१८१ अधिकृत ऑटो…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल येथील शिक्षक श्री प्रवीण मनोहरराव सोनोने हे नियत वयोमानानुसार 31 वर्षाच्या प्रदीर्घसेवे नंतर 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलासराव पोहंडूळकर, संस्थेचे सदस्य ॲड. अशोक सोनी, श्री पवनकुमार झांजरी, सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर, श्री एम. जी. विहीटकर , मुख्याध्यापक अरूण बोराडे , उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार सत्कारमुर्ती प्रवीण सोनोने,पत्नी सौ. प्रियंका सोनोने, आई सुमन सोनोने आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवीण सोनोने यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.…

