परभणी, (प्रतिनिधी) : पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “सेवा, सुशासन अभियान – आंगण का मिलन” या उपक्रमांतर्गत परभणी शहरातील सिद्धार्थ नगर येथील अंगणवाडी क्र. ३० येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला.
बालकांचे पोषण, आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्या हस्ते सेविकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी भाजपा सरचिटणीस सौ. मंगलताई मुदगलकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. मनीषा जाधव, नगरसेविका सौ. सपना जुकटे, सौ. सुशिला थोरात, चिटणीस सौ. रूपाली ठाकरे, सौ. प्रभावती अन्नपुर्वे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. अपर्णा जोशी, श्री. अक्षय अन्नपुर्वे तसेच परिसरातील नागरिक व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत समाजाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सेवा, सुशासन व जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रहित आणि समाजसेवेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


