परभणी (प्रतिनिधी) मौजे पेडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी दि 10 जून रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शहीद खान उपस्थित असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे शिवसेनेचे नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष परभणी धैर्यशील (राजू) कापसे पाटील तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष परभणी, आनंद भरोसे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे . प्रमुख उपस्थिती म्हणून सोनल देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख पाथरी विधानसभा मुंजाभाऊ नाना टाकळकर शिवसेना महानगर अध्यक्ष परभणी नितेश देशमुख तसेच शिवसेना तालुकाप्रमुख परभणी माऊली कदम आर्वीकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद लोहगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, राज्यस्तरावरून सदरील निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक कारणाने, असमन्वय झालाच तर स्वतंत्र लढायची गरज पडलीच तर आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, कार्यकर्त्यांनी , पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचीही तयारी असू द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ राजेश विटेकर यांनी परभणी येथील संवाद व संघटनात्मक बैठकीत बोलताना सांगितले. सन 2014 प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका ,पंचायत समिती, जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूनी एक नंबर वर असल्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था वर राष्ट्रवादी…
परभणी (प्रतिनिधी)आज कृषी विज्ञान केंद्र परभणी च्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प अभियान कार्यक्रमात रूढी व खरबा परिसरातील संत्रा बागायतदार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे उपसंचालक संशोधन प्राध्यापक डॉ हरिहर कौसडीकर यांनी संत्रा बागेसाठी जमिनीचे आरोग्य आणि संतुलित पीक पोषण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी बहार व्यवस्थापन, फूल गळ, फळगळ, रोग व कीड व्यवस्थापन , दर्जेदार फळ उत्पादन या बाबत प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले. डॉ कौसडीकर यांनी सध्या परभणी परिसरातील संत्रा बागेतील जमिनीचे आरोग्य बिघडलेले निदर्शनास आले असून सेंद्रिय कर्ब कमी झाले असून सहा ते आठ अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत त्यामुळे…
मुंबई, – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘खरीप हंगामात पेरणीची तयारी व पीकांचे नियोजन’ या विषयावर परभणी जिल्ह्यातील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक तसेच जमिनीचे आरोग्य आणि पिकांचे पोषण तज्ज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ६, शनिवार दि. ७, सोमवार दि. ९ आणि मंगळवार दि. १०, जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला…
परभणी( प्रतिनिधी ) शासनाने केलेल्या पीक कापणी प्रयोगात पिकांचे उत्पन्न कमी आलेले आहे मात्र कंपनीने केलेल्या पीक कापणी प्रयोगात उत्पन्न जास्तीचे आलेले आहे, कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न निघाल्याचे दाखवले आहे ते मान्य नाही असे कारण दाखवून icici लोंबार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा देण्यासाठी चालवलेली बनवा बनवी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावली, जर शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी दबाव टाकून कमी उत्पन्न दाखवले आहे अशी तक्रार तुम्ही त्याचवेळी जिल्हाधिकारी यांच्या कडे नोंदवली होती का ? तसेच एखाद्या ठिकाणी तसा प्रकार झाला असेल असे आपण मान्य केले तरी सर्व जिल्ह्यात तसे प्रकार झाले होते याला पुरावे काय आहेत,…
परभणी (प्रतिनिधी) संबोधी अकादमी, महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परभणी येथे २४ वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार, ता. १ जुन २०२५ रोजी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले हायस्कुलच्या मैदानावर संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण 81 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. Iयावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळे घेणे हे फार मोठे सामाजिक कार्य असून ते गेल्या 24 वर्षांपासून संबोधी अकादमी करत आहे. आजपर्यंत 3000 जोडप्यांचे विवाह लावणे ही फार मोठी क्रांतिकारी बाब आहे. सामूहिक विवाह सोहळे वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी संबोधी अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला…
परभणी (प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सगुना रुरल फाउंडेशन, नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) यांच्यात दिनांक ३० मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही संस्थांनी परस्पर सहकार्याने शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या करारावर विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि सगुना रुरल फाउंडेशनचे संस्थापक श्री चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. मदन पेंडके उपस्थित होते. सगुना रुरल फाउंडेशन ही संस्था नैसर्गिक शेतीमध्ये नवोन्मेषी प्रयोगांसाठी देशभरात ओळखली जाते. यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सगुना…
परभणी (प्रतिनिधी) मध्य आणि पश्चिम भारतातील सर्वांत मोठे माध्यम समूह असलेल्या नवभारत – नवराष्ट्र मीडिया समूहाच्या वतीने शुक्रवारी (दि.30) ‘मराठवाडा हेल्थ आयकॉन’ सन्मान सोहळा २०२५ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये करण्यात आले होते. मराठवाडा विभागातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरलेल्या काही निवडक डॉक्टरांचा सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी फुलंब्री मतदारसंघाच्या आ. अनुराधा चव्हाण, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर Evolution Vision या कंपनीच्या संचालिका गीता आचार्य, नवभारत वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास, सरव्यवस्थापक कल्याण पांडे तसेच…
परभणी (प्रतिनिधी) येथील विद्यानगर भागातील ज्येष्ठ नागरिक तथा माजी मुख्याध्यापक त्र्यंबकराव सुगावकर यांचे शनिवारी रात्री वृद्धकाळामुळे निधन झाले.मृत्यू समयी ते 95 वर्षांचे होते. येथील विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक सुगावकर यांनी प्रभावती विद्यालयाची स्थापना केली.या संस्थेत ते मुख्याध्यापक म्हणूनही कार्यरत होते. शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रतिष्ठानाशी ते संलग्न होते. धार्मिक कार्यात सुद्धा त्यांचे मोठे योगदान होते. शांत ,संयमी, उत्तम संघटक असणारे सुगावकर यांचा जिल्हासह मराठवाड्यात मोठा मित्रपरिवार होता. दरम्यान सुगावकर यांच्या पश्चात पत्नी, महेश,दिनेश हि दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान सुगावकर यांच्या पार्थिवावर रविवारी जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
परभणी,(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षण आणि गरजू रुग्णांसाठी देहदानाचा महत्त्वपूर्ण उपक्रम परभणी येथील आर. पी. हॉस्पिटल आणि परभणी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविला जात आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देत, सेलू (जि. परभणी) येथील श्री. बाबासाहेब सोनबा बाबर आणि त्यांच्या पत्नी सौ.कालिंदा बाबासाहेब बाबर यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. परभणी मेडिकल कॉलेज आणि आर. पी.हॉस्पिटलने या उपक्रमाला गती देत अनेकांना देहदानासाठी प्रेरित केले आहे. या उपक्रमांतर्गत देहदानाची प्रक्रिया सुकर आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सेलू येथील बाबासाहेब आणि कालिंदा बाबर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा संकल्प केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात देहदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी…

