परभणी (प्रतिनिधी) येथील विद्यानगर भागातील ज्येष्ठ नागरिक तथा माजी मुख्याध्यापक त्र्यंबकराव सुगावकर यांचे शनिवारी रात्री वृद्धकाळामुळे निधन झाले.मृत्यू समयी ते 95 वर्षांचे होते.
येथील विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक सुगावकर यांनी प्रभावती विद्यालयाची स्थापना केली.या संस्थेत ते मुख्याध्यापक म्हणूनही कार्यरत होते.
शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रतिष्ठानाशी ते संलग्न होते. धार्मिक कार्यात सुद्धा त्यांचे मोठे योगदान होते. शांत ,संयमी, उत्तम संघटक असणारे सुगावकर यांचा जिल्हासह मराठवाड्यात मोठा मित्रपरिवार होता.
दरम्यान सुगावकर यांच्या पश्चात पत्नी, महेश,दिनेश हि दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान सुगावकर यांच्या पार्थिवावर रविवारी जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.