सेलू :(प्रतिनिधी) मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, शाळेच्या स्वराज लक्ष्मण जाधव याने १०० टक्के गुण घेऊन राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रावीण्य श्रेणीत ११५, तर २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण विशेष प्रावीण्य मिळविले आहे. संस्कृत विषयात ६, तर विज्ञान विषयात एका विद्यार्थ्यांने १०० टक्के गुण मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. दहावीचा निकाल मंगळवारी, १३ मे रोजी जाहीर झाला. सेलू तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला नूतन विद्यालयाचे सर्वाधिक एकूण ५०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४४० विद्यार्थी (८७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर या शाळे चा जिंतूर शहरात दहावीच्या निकालामध्ये द्वितीय क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये लागलेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये जिंतूर येथील सिद्धेश्वर विद्यालयाचा निकाल 96.66% इतका लागला असून सेमी इंग्लिश चा निकाल सलग चौथ्या वर्षी 100% लागलेला आहे यात विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना अभिनंदन तथा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार एडवोकेट गणेश रावजी दुधगावकर संस्थेच्या सचिव डॉ संध्याताई दुधगावकर संस्थेचे सहसचिव समीर भाऊ दुधगावकर यांनी केले. क्रीडा सांस्कृतिक स्काऊट गाईड नाटक बालनाट्य या क्षेत्रातील नावलौकिका बरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील निकालही या शाळेची जिंतूर शहरातील आपली…
ताडकळस (प्रतिनिधी)म हाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.कै. कमळाबाई वडकुते माध्यमिक विद्यालय, ताडकळस या विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा निकाल शाळेचा एकूण निकाल 96.22% लागला आहे. एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी 53,उत्तीर्ण विद्यार्थी 51, अनुत्तीर्ण विद्यार्थी 02 सर्वप्रथम कु. दळवी मयुरी मारुती 93.80%द्वितीय क्रमांक कु. लेंडाळे गायत्री भागवतराव 86.40% तृतीय क्रमांक मगरे प्रणिता प्रकाश 80.40% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. रामराव वडकुते,कार्याध्यक्ष विठ्ठलराव वडकुते,अध्यक्ष दिलीपराव वडकुते , विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून गौरविण्यात आले.
परभणी (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक 5 मधील ३६ इंची नाल्याचे पाणी दासगणू नगर मधून न काढून देता इतर व्यवस्थित नाली मधून नेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन परभणी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. प्रभाग क्रमांक 5 मधील श्री संत दासगणू नगर मध्ये जे सद्यस्थिती नाली व्यवस्था आहे ती पुरेसे नसून ती कॉलोनी च्या सांडपाण्यासाठी सुद्धा मुबलक नाही. सध्यस्थिती तिथे पाणी घरा आत मध्ये जाते व रहिवाश्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मागील काही दिवसापासून महानगर पालिका प्रभाग 5 मधील 20-25 कॉलोण्याचे 36 इंची नाल्याचे पाणी नगरातील 9 इंची नाल्या मार्फत सोडण्याचा विचार करत आहे. ही चुकीची जोडणी करण्यात येऊ नये. जेणे करून…
परभणी (प्रतिनिधी)शहरातील संस्कृती विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी समृद्धी सुधाकर श्रीखंडे हिने दहावीला 96 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि.१३ मे रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर केला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा निकाल 89% लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान नांदखेडा रोडवरील संस्कृती विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी समृद्धी श्रीखंडे तिला 96% गुण मिळाले आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकसंचार परिवारातर्फे तिचे अभिनंदन.
परभणी, (प्रतिनिधी) परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून अत्याधुनिक 1.5 टेसला MRI युनिटचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आमिर तडवी, डॉ. दीपक कुबडे, डॉ. दैठणकर, डॉ.संतोष हारकळ,डॉ.शहाजी बोडखे,डॉ.तांबोळी, डॉ.फैज,डॉ.भीमराव कनकुटे,डॉ. बाबासाहेब गायकवाड,राहुल कांबळे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.वेदप्रकाश पाटील म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात MRI सुविधा 1.5 टेसला MRI मशीन हे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असून, यामुळे मेंदू, मणक्याचे आजार, सांधे, मांसपेशी आणि अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान शक्य होणार आहे. आ.डॉ.पाटील म्हणाले, जनतेला आधुनिक वैद्यकीय सुविधा…
परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 89.24 टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. तर आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 66 शाळांचा निकाल हा 100 टक्के तर 5 शाळांचा निकाल हा शून्य टक्के एवढा लागला आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावी वर्ग असलेल्या शाळांची संख्या 441 एवढी आहे. त्यापैकी 66 शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला असून पाच शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. 90.01 ते 99.99 टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या 149, 80.01 ते 90 टक्के निकालाच्या 116 शाळा, 70.01 ते 80 टक्के निकालाच्या…
परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयात ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड.. गणेशराव दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना स्वातंत्राच्या पंच्याहत्तर वर्षात देशाने नेत्रदीपक अशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती केली आहे. संकट प्रसंगी देशातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी जात, वंश, पंथ, धर्म व संप्रदाय विसरुन राष्ट्रीय एकात्मतेसाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी याच्या सोबत राहुन भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविले पाहीजे. दहशतवाद निर्माण होऊ नये म्हणुन प्राध्यापकांनी, शिक्षकांनी , विद्वानांनी व बुध्दिजीवीनी राष्ट्रहितासाठी सहयोग देणे ही काळाची गरज आहे. या अभिनंदन सभेचे प्रास्ताविक प्राचार्य. प्रो.डॉ.शेख मो.…
परभणी( प्रतिनिधी ) दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदीप कामले हे आज परभणी रेल्वे स्थानकावर तपासणीसाठी आले असता स्थानकातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून त्वरित प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. याबाबत माहिती अशी की दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक प्रदीप कामले व त्यांची टीम आज मराठवाड्यातील परळी, गंगाखेड आणि परभणी या स्थानकाची तपासणी करण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजता परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रुस्तुम कदम, कदिर लाला हाश्मी, माणिक शिंदे बलसेकर , विठ्ठल काळे आदींनी त्यांची भेट घेऊन परभणी स्थानकावरील विविध समस्या…
पालम (प्रतिनिधी)) दिनांक ५ तारखेला शेतकर्यावर अस्माणी संकट कोसळले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी किसान एकता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हात दिनांक ५ मे रोजी वादळी वार्यामूळे शेतकर्यांचे मोठे अर्थीक नूकसान झाले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाच्या वतीने संघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रिय कृषि मंत्री स्वराजसिंग चव्हाण भारत सरकार नई दिल्ली यांना परभणी जिल्हयात अचानक पणे आलेल्या वादळीवारे व पाऊस यामुळे जिल्हातील शेतकऱ्याच्या केळी आंबा, संत्रा, मोसंबी या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. सविस्तर वृत्त असे की जिल्हात…

