परभणी (प्रतिनिधी)शहरातील संस्कृती विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी समृद्धी सुधाकर श्रीखंडे हिने दहावीला 96 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि.१३ मे रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर केला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा निकाल 89% लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान नांदखेडा रोडवरील संस्कृती विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी समृद्धी श्रीखंडे तिला 96% गुण मिळाले आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकसंचार परिवारातर्फे तिचे अभिनंदन.