परभणी (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक 5 मधील ३६ इंची नाल्याचे पाणी दासगणू नगर मधून न काढून देता इतर व्यवस्थित नाली मधून नेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन परभणी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.
प्रभाग क्रमांक 5 मधील श्री संत दासगणू नगर मध्ये जे सद्यस्थिती नाली व्यवस्था आहे ती पुरेसे नसून ती कॉलोनी च्या सांडपाण्यासाठी सुद्धा मुबलक नाही. सध्यस्थिती तिथे पाणी घरा आत मध्ये जाते व रहिवाश्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
मागील काही दिवसापासून महानगर पालिका प्रभाग 5 मधील 20-25 कॉलोण्याचे 36 इंची नाल्याचे पाणी नगरातील 9 इंची नाल्या मार्फत सोडण्याचा विचार करत आहे. ही चुकीची जोडणी करण्यात येऊ नये. जेणे करून रहिवाश्यांना त्रास होणार नाही.
प्रभाग क्रमांक 5 मधील ३६ इंची नाल्याचे पाणी दासगणू नगर मधून न काढून देता इतर व्यवस्थित नाली मधून नेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन परभणी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.
निवेदनावर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय डहाळे, मा. नगरसेवक रितेश जैन, शंकर आजेगावकर, सौ. अनुराधा जोशी, सौ. गायत्री जोशी, मंजुषा वि. औंढेकर, श्रेयस औंढेकर, राजेंद्र चौधरी, पराग पद्माकर कंदी, विश्वंभर पत्तेवार, कृष्णा कोठेकर, जयंत जोशी, वैभव पत्तेवार, सौ. प्रतिमा चौधरी, सौ. राधिका कोठेकर,सौ. सनयना पांडे, सौ. जयश्री पत्तेवार, सौ. उषा जोशी, सौ. कांचन कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत