Author: Lok Sanchar

मुंबई,  : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे. निर्मल भवन येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत करावयाच्या कार्यवाही संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील…

Read More

पालम (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील रेणूकामाता निवासात कोणीच राहत नसल्याचा फायदा आज्ञात चोरट्याने घेतला दि.२७ रोजी सकाळी हि घटणाउघडकीस आली, यामध्ये दोन लाख ९९ हजाराचा ऐवज लपवास केला आहे, या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या सुरू असलेल्या चोरीच्या घटना दिवसात दिवस वाढ होत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देणे चे गरज आहे आसे नागरिकांतून बोलले जात आहे. शहरातील पालम गंगाखेड रस्त्यावरील हाकेच्या अंतरावर श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे, याच मंदिराच्या समोर सहकार क्षेत्रात लेखापाल म्हणून कार्यरत असलेले महेंद्रकुमार रोहिनकर यांचे घर आहे त्यांच्या घरात कोणीच राहत नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराची…

Read More

गंगाखेड. (प्रतिनिधी)  प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 29 एप्रिल रोजी परशुराम जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले असून गंगाखेड शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे शहरातील पाठक गल्ली येथील कुंदेश्वर मंदिरापासून सायंकाळी चार वाजता शोभायात्रा निघणार असून शेटे गल्ली भगवती चौक श्रीराम चौक मार्गे शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे शोभायात्रेचा समारोप होणार असून या ठिकाणी ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त ब्रह्मवंदानी या शोभा यात्रेत सामील व्हावे असे आवाहन भगवान परशुराम जन्मोत्सव समिती व व तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आले आहे..

Read More

परभणी : प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षीं मंगलवार, दि. 29 एप्रिल रोजी सायंकाळी श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सर्व हिंदु बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून शोभायात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेची सुरुवात सायंकाळी ठीक ५ वाजता छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार असून सांगता राजाराम सभागृह गांधी पार्क येथे होणार आहे. शोभायात्रेत शक्य असल्यास सर्व पुरुष मंडळीनी भगवा/किशरी शर्ट आणि महीलांनी भगव्याकेशरी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सर्वांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीचे स्वप्नील…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील समांतर पाणी पुरवठा योजना,भूमिगत गटार योजना आणि रखडलेले नाट्यगृह हे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल अशी माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली. परभणी शहरात समांतर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजना मार्गी लागावी तसेच रखडलेले नाट्यगृह पूर्ण व्हावे यासाठी आ.डॉ.राहुल पाटील हे मागील काही दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत.दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी येथे आले होते, त्यावेळी देखील आ.पाटील यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली त्यानुसार मंत्रालयामध्ये आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली.या बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर,अर्थ राज्यमंत्री आशिष…

Read More

परभणी ( प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज मुंबई येथे ऑनलाईन बैठक घेतली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अंडर ग्राउंड ड्रेनेज , कर्मचारी सेवानिवृत कर्मचारी यांच्यासाठी सहाय्यक अनुदान, नाट्यगृह, तसेच क्रीडांगण साठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील जमीन हस्तांतरण, यासह इतर विकासकामाबाबत चर्चा झाली जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी सर्व सुयोग्य प्रस्ताव तयार करून माझ्याकडे सादर करावेत मी स्वतः त्या त्या मंत्री व सचिव यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी माझी यंत्रणा कामाला लावणार आहे या बैठकीस पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर आ राजेश विटेकर आ रत्नाकरराव गुट्टे आ राहुल पाटील यांच्या सह प्रधान सचिव नगरविकास गोविंदराज जिल्हाधिकारी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) मागील बरेच दिवसापासून पेडगावं येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असून गावकऱ्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते मात्र तेही काम बऱ्याच दिवसापासून रेंगाळत आहेत.त्यामुळे ग्रामपंचायतने हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी उपायोजना करणे आवश्यक होते, मात्र ग्रामपंचायत च्या वतीने कुठलीही पर्याय उपाययोजनांना करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांच्या वतीने आज ग्रामपंचायत मोर्चा घागर मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायत चे कुणीही जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संतप्त महिलांनी पेडगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याप्रसंगी ग्रामस्थ व महिला मोठ्या…

Read More

परभणी  (प्रतिनिधी) पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विकास आराखड्याच्या बैठकीत दिली . तसेच नवीन विकास आराखडा पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून आ राजेश विटेकर यांच्याकडे सोपवित आहे असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बैठकीत दिले , पाथरी येथील विकास आराखड्या बाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी नाराजी दर्शविली अत्यंत छोट्या स्वरूपात व ज्या व्यक्तीस कोणत्याही मोठ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा अनुभव नाही अशा विकासक, सल्लागाराने हा आराखडा तयार केलेला आहे, पंढरपूर, शेगाव, माहूर अशा देवस्थानचा आराखडा तयार…

Read More

पालम (प्रतिनिधी) येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत अखंड नामजप व यज्ञ सप्ताह मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. आज शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता झाली. सकाळी साडेदहा नंतर आरती व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी आरती व महाप्रसादाचा लाभ भक्तीमय वातावरणात घेतला.

Read More

गंगाखेड (प्रतिनिधी) ध्येयप्रकाशन पाचगणी आयोजित *आय एम द विनर* ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर संपन्न झाली. त्यामध्ये सरस्वती विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी राघव राजेश लोंढे याने परभणी जिल्ह्यातुन सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल सरस्वती विद्यालय परिवारातर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, परीक्षा विभाग प्रमुख गोपाळ मंत्री, पालक राजेश लोंढे सह इतर सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Read More