Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी (दि.24) संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी (दि.23) जिल्हाधिकारी कार्यालयात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करीत पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारुन अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले. तर अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या कृत्याची सकल हिंदू समाजाने गांभीर्याने दखल घेतली असून सकल हिंदू समाजाने आपल्या भावना व्यक्त करण्याकरीता गुरुवार 24 एप्रिल रोजी संपूर्ण जिल्हा बंदची हाक दिली आहे. सायंकाळी 5 वाजता शनिवार…

Read More

सेलू. (प्रतिनिधी) जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी आज सोमवारी जवळपास चार तास जोरदार.रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जालना- नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत असून शेतकऱ्यांना पुरेसा मावेजा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तसेच या प्रकरणी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भु संपादन बाबतीत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी एकंदरीत या शेतकऱ्यांचीं मागणी होती. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाचे प्रतिनिधी तथा तहसीलदार श्री मगर यांना निवेदन दिले. या मध्ये असे नमूद केले होते कि, दि 04-10-2024 रोजी जिल्हास्तरीय दरनिश्चीतीची बैठक झाली होती, त्यामध्ये समितीने सादर…

Read More

पालम( प्रतिनिधी ) : पालम तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीचे येत्या पंचवार्षिकतेसाठी सरपंच उपसरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य त्याचबरोबर इतर नागरिक यांचे उपस्थितीत सोडण्यात आले ते पुढील प्रमाणे अनुसूचित जाती महिलेसाठी पाच, अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी चार, अनुसूचित जमाती महिला एक, अनुसूचित जमाती सर्वसाधारण दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलां साठी नऊ, नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी नऊ, सर्वसाधारण महिलेसाठी आठरा, सर्वसाधारण साठी आठरा अशाप्रकारे तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आज रोजी शासनाचे नियमानुसार योग्य ती प्रक्रिया पार पाडून जाहीर करण्यात आले त्यावेळी नायब तहसीलदार राजेश्वर पवळे,…

Read More

परभणी (प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून पाथरी रोड येथील आर.पी हॉस्पिटल येथे येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अत्याधुनिक MRI (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) सेंटर सुरू होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांना अचूक निदान आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल. अशी माहिती महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली. या नवीन MRI सेंटरमध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये उच्च रिझोल्यूशन इमेजिंग, जलद स्कॅनिंग आणि रुग्णांच्या सोयीसाठी विशेष सुविधांचा समावेश आहे. हे सेंटर मेंदू, हृदय, सांधे आणि इतर अवयवांचे तपशीलवार निदान करण्यास सक्षम असेल. याशिवाय, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धातू-मुक्त वातावरण आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांचा समावेश आहे. आर.पी.हॉस्पीटल चे…

Read More

परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कारेगाव येथील वसंत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हा डॉ. आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रविण धाडवे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, नजीर खान, जकीयोद्दीन खतीब, राजकुमार हट्टेकर, विठ्ठलराव वडकुते, मोईन खान, शिवशंकर सोनुने, मंदार कुलकर्णी, लक्ष्मीकांत बनसोडे, अरुण रणखांबे, तय्यब पठाण,…

Read More

पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथील भारतरत्न डॉ बाळासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती उत्सव आयोजनासाठी बुद्ध विहार पेठ शिवणी येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विलास वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तर उपाध्यक्षपदी किशोर वाघमारे , सचिव पदी पत्रकार अंकुश वाघमारे, सहसचिव पदी दिनाजी भालेराव, कोषाध्यक्षपदी सिद्धार्थ जोंधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून प्रति वर्षाप्रमाणे काही वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येणार असून दि २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न होईल तसेच ४:००वाजता पेठ शिवणी गावातील…

Read More

पालम. (प्रतिनिधी)  सभागृहच्या माध्यमातून अखंडता जगता येईल असे प्रतिपादन आ. रत्नाकर गुट्टे यांनी दि. १९ रोजी शनिवारी तालुक्यातील खडी येथील स्थानिक निधीतून उभारण्यात आलेल्या तक्षशिला बौद्धविहार सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना आ. गुटे म्हणाले की गावखेड्यात अशी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यामुळे गरजू व गोरगरीबांना कौटुंबिक सोहळे साजरे करणे शक्य होईल. ग्रामस्थांना एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेता येतील. तसेच त्यातून एकता, अखंडता जपता येईल, असे आ.डॉ.गुट्टे साहेब यांनी म्हटले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामचंद्र निळे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर लांडगे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पवन सोन्नर, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष गंगाधर मस्के, साहेबराव नखाते, मनोहर…

Read More

पालम :- शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी सुभाषराव भागोजी रूद्रवार वय 69 वर्ष यांचे दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 8 वाजता निधन झाले आहे त्याच्या पश्वात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ, बहिनी असा मोठा परीवार आहे दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता हिंदु स्मशानभुमी गंगाखेड रोड पालम येथे अंत्यविधी होणार आहे

Read More

गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न ‘परभणी (प्रतिनिधी)तंत्रज्ञानासोबत संस्कारांची रुजवणूक आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले. ते जुने ते सोने, नवे ते हवे’ या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील तालुका व जिल्हास्तरावरील विजेत्या शिक्षकांचा सन्मान परभणीत संपन्न झाला.यावेळीं बोलत होते. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन…

Read More

पालम (प्रतिनिधी) कृ. उ बाजार समिती येथे विविध कार्यकारिणी सोसायटी सावंगी थडी चेअरमन पदी ओंकार साहेबराव ठाकूर यांची आणि उमरा सोसायटी चेअरमनपदी उगले साहेब माधवराव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा व सर्व सदस्य यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी गणेशराव रोकडे दादा (रासपा प्र.उपा म.राज्य तसेच संचालक जि.म.सह बँक परभणी) सावंगीथडी सदस्य कोंडीबा सखाराम ठाकूर, मुरलीधर विठ्ठल ठाकूर ,पंढरी विठ्ठल ठाकूर, एकनाथ भीमराव ठाकूर,गजानन व्यकंटराव ठाकूर,त्रिबंक गोविंदराव ठाकूर, किशोरभाई दसराव ठाकूर,परसराम नरहरी ठाकूर, सीताराम मारोती ठाकूर,बालाजी राघोबा ठाकूर आणि उमरा सोसायटी सदस्य पांडुरंग हगदळे, रावसाहेब,विद्या उगले शेख बानूब, माधव बोडके, हरी काचूळे, नारायण उगले, चंद्रकांत पौळ,भास्कर शिंदे,दत्ता गिरी, नवनाथ…

Read More