परभणी,(प्रतिनिधी) येथील आर. पी. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेली ६२ वर्षीय बेशुद्ध अवस्थेत दाखल झालेल्या महिलेला टेम्पररी पेस मेकर या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करत जिवदान दिले आहे. आ.राहुल पाटील यांच्या आर. पी. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेली ६२ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत दाखल झाली होती.रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने केलेल्या इसीजी व इतर तत्सम तपासणीनंतर तिचे हृदयाचे ठोके अनियमित व अतिशय कमी प्रमाणात होते, अपुरे रक्तपुरवठ्यामुळे हृदययाची स्पंदने निर्माण करणारे नोड अतिशय कमकुवत झाले असे आढळले. हृदयाचा रक्त पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्याचे ठरले, परंतु हृदय गती अतिशय कमी असल्या कारणाने (कम्प्लिट हार्ट ब्लॉक ) यावर उपचार म्हणून हृदयात…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारउद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या सोबत माजी मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती आ राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड येथून श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे सकाळी नऊ वाजता दर्शन साठी येणार आहेत तर त्यानंतर साडे दहा वाजता जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर महानगरपालिका कार्यालयात महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामाचा आढावा घेतील, या शासकीय कार्यक्रमानंतर दुपारी बारा वाजता अक्षता मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता…
पालम (प्रतिनिधी) दि.25 रोजी पालम शहर बंद चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यापारी, हॉटेलमालक, दुकानदार, यांनी स्वयंफुर्रतेनी बंचे आयोजन केले होते. तसेच विविध सामाजिक संघटना सकल समाजा कडून पालम नायब तहसिलदार राजेश्वर पवळे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात याना निवेदन देण्यात आले,या निवेदनात जम्मू-काश्मीर राज्यातील पर्यटनस्थळ पहेलगाम या ठिकाणी हिंदू बांधव का म्हणून गोळ्या घालण्यात आलेल्या अतिरेक्यांनी बेछूट गोळ्या झाडून 27 लोकांचा जीव जीव घेतलेला आहे तर काही जणांना गंभीर जखमी केले. या मुळे पालम येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 25 एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ स्वयं स्फूर्तीने शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान सकाळी 11 वाजता सर्व सामाजिक बांधव एकत्र…
परभणी(प्रतिनिधी)जम्मू – काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि० २४)रोजी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्यावतीने काल बुधवार रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध म्हणून परभणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या आवाहनाला प्तिसाद देत परभणी शहरातील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने, प्रतिष्ठाने आणि अंतर्गत वाहतुकीची सेवा कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. तर परभणी बंद मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेंडॉल उभारण्यात आला आहे. या पेंडॉल परिसरात अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती आहे दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहरातील…
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथील व्यापाऱ्यांनी जम्मू-काश्मीर राज्यातील पर्यटनस्थळ पहेलगाम या ठिकाणी हिंदू बांधवावर अतिरेक्यांनी बेछूट गोळ्या झाडून 27 लोकांचा जीव घेऊन काही जणांना गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती देशभरात समाज माध्यमावरून लोकांना समजली. त्यात पेठ शिवणी येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 24 एप्रिल गुरुवार रोजी या घटनेच्या निषेधार्थ स्वयं स्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे पेठ शिवणी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान सकाळी 11 वाजता सर्व व्यापारी बांधव एकत्र येऊन अतिरेकी भ्याड हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या हिंदू बांधवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. पेठशिवणी बाजारपेठ बंद असल्याची माहिती समजताच पालम पोलीस ठाण्याचे…
परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील गोदापात्र कोरडे पडले असून जनतेस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे , यासाठी गोदावरी नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली अत्यंत दूरदृष्टीने मराठवाड्यात उभारलेल्या विष्णुपुरी टप्पा दोन अंतर्गत येणारे खडका, मुदगल, तारू गव्हाण, ढालेगाव व नाथरा साखळी बंधारे हे प्रत्येकी 1.10 टीएमसी क्षमतेचेचे असून सदरील बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. सदरील बंधाऱ्यावर एकूण जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्र हे याच सिंचनावर अवलंबून आहे. या बंधाऱ्यावरील क्षेत्रामध्ये ऊस क्षेत्र व फळबाग लागवड क्षेत्र हे अधिक असून सदरील पिकांना सद्यस्थितीत पाण्याची…
पालम (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.सुनीलजी जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” बळीराजा विद्यालय, मरडसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अशोकजी कोरडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणप्रेमी मा. पांडुरंग काळे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात मा. मोरताटे सर यांच्या रसाळ सूत्रसंचालनाने झाली. प्रस्तावना श्री मांजरमे सर यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा व अन्य शालेय उपक्रमांमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा शाळेच्या व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अविनाश गजानन जाहिर , व्यंकटेश बालासाहेब वाकडे…
परभणी, (प्रतिनिधी): काश्मीरमधील पहलगाम येथील अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात 24 एप्रिल रोजी विविध संघटनांच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद शांततेत पार पडावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. काळे बोलत होते. त्यांनी नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखावी, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)…
परभणी,(प्रतिनिधी) : जम्मू काश्मिर येथील पहलगाम या पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील शिवसेनेच्या (शिंदे गट) नेतेमंडळींनी बुधवारी (दि.23) परभणीत जोरदार निदर्शने केली. जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, संपर्कप्रमुख माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, सहसंपर्क प्रमुख भास्कर लंगोटे पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हा प्रमुख धम्मदीप रोडे, मागासवर्गीय जिल्हा सेलचे माजी जिल्हा प्रमुख माणिकराव कदम, महानगरप्रमुख नितेश देशमुख, तालुका प्रमुख प्रभाकरराव कदम, विधानसभा संघटक अशोकराव पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर करीत या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, असे नमूद केले. या अतिरेकी कारवायांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याकरीता सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी अपेक्षाही…
परभणी, (प्रतिनिधी) जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांना ठार मारले,या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. अतिरेक्यांचा हा हल्ला निंदनीय आणि भ्याड असून केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलून अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी, दहशतवादाला समूळ नष्ट करावे अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली आहे आमदार पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर,युवासेना…

