Author: Lok Sanchar

परभणी, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया अभियान सन 2025-26 अभियान अंतर्गत सोयाबीन व करडई या पिकासाठी परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सदर अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पिकनिहाय मुल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा तेलबिया समितीने निवड केलेल्या मुल्य साखळी भागीदार यांचेमार्फत शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवायचे आहेत. तरी याबाबतचे निकष खालीलप्रमाणे आहेत. परभणी जिल्ह्यातील पिकनिहाय मुल्य साखळी भागीदार म्हणुन शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे आपले परिपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. पात्रता निकष- कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी. ज्या तालुक्यात समुह…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरातील पेडगाव रोड वरील वैभव नगर प्रताप नगर इनायत नगर परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या कुत्रा पैकी एका कुत्र्याने आज शुक्रवारी सकाळी आठ जणांचा चावा घेतला असून या पिसाळलेल्या कुत्र्याचं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे. शहरातील जुना पेडगाव परिसरात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ही कुत्री आता नागरिकांवर हल्ले करू लागले आहेत रात्री अपरात्री प्रवास होऊन येणाऱ्या प्रवाशांवर देखील हल्ला करीत आहेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास या कुत्र्यांपैकी एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका वृद्ध महिलासह इतर सात जणांचा चावा घेतला. या रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारार्थ दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. या परिसरात…

Read More

परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकूळे, तहसीलदार संदिप राजपुरे, नायब तहसिलदार आणि महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सह दुय्यम निबंधक बी.एस.घुगे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. *-*-*-*-*

Read More

परभणी, (प्रतिनिधी)ः परभणी येथील आर. पी.हॉस्पिटलमध्ये लहान बालके तसेच नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी सर्व प्रकारच्या मोफत लसीकरण सुविधेसाठी अत्याधुनिक लसीकरण केंद्राचे उद्घाटन दिनांक 30 एप्रिल रोजी  करण्यात आले. या केंद्रामुळे परभणी आणि परिसरातील बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि पूर्णपणे मोफत लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. हा उपक्रम स्थानिक पातळीवर बाल आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यावेळी  परभणी मेडिकल कॉलेज आणि आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख  आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी स्त्रीरोग तज्ञ डॉ भीमराव कनकुटे, डॉ भगवान कोरडे, डॉ.एकनाथ गबाळे, डॉ बाबासाहेब गायकवाड,डॉ. दैठणकर, डॉ प्रियंका सुरोडवार, डॉ नीरज तापडिया ,डॉ.शहाजी बोडखे, डॉ कैलास…

Read More

परभणी,(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसिलदार संदिप राजापुरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे,…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे,अनेक संत आपल्या कार्याने आणि विचाराणे मोठे झाले आहेत,प्रत्यकाने त्यांचे आचार,विचार कृतीमध्ये आणावेत,असे प्रतिपादन प्रदिप रुघे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. जिंतूर रोड वरील दत्तनगर येथील गार्डन मध्ये संत तुकडोजी महाराज,भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. परभणी महानगर पालिकेचे माजी महापौर भगवानजी वाघमारे यांच्या हस्ते तीनही प्रतिमेचे पुष्पहार घालून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य लड्डा,  भागवत शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य  पवार,प्राचार्य  पाटील , डॉ.रेवनवार ,डॉ. शिंदे , प्रा.सोंडगे, पंजाबराव देशमुख,डॉ. कान्हेकर,सौ अंजली सुतारे सौ.अर्चना जैन आणि इतर असंख्य सदस्य उपस्थित होते . या परिसरातील सर्वांना…

Read More

गंगाखेड ( प्रतिनिधी) येथील परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा दिनांक 29 रोजी भगवान परशुरामाचा जन्मदिनानिमित्त काढण्यात आली होती या शोभायात्रेत सजीव देखावे आकर्षक लाइटिंग आकर्षक ढोल ताशाचा गजर, टाळ मृदंगाचा खणखणाट, फटाक्यांची आतिषबाजी, भगवान परशुरामाच्या जयघोषाने संपूर्ण गंगाखेड परिसर दनाणला होता. दिनांक 29 रोजी भगवान परशुराम यांची जयंती अर्थात जन्मदिन होता त्यानिमित्ताने गंगाखेड शहरांमध्ये भव्य दिव्य अशी शोभायात्रा संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हजारो भाविकांच्या सहभागाने शोभायात्रेचा आरंभ ह भ प माणिक महाराज नाव्हेकर, ह भ प केशव महाराज पालमकर, वेद संपन्न अशोक पाठक, नारायण गुरु जोशी, दिलीप गुरु पाठक यांच्या हस्ते भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन…

Read More

परभणी (प्रतिनिधी) सिताबाई रामभाऊ शेळके वय 72 वर्षे रा तुळजापूर ता जि परभणी ह मु. लक्ष्मी नगर जुना पेडगाव परभणी येथे त्यांचे रात्री 9 च्या दरम्यान दुःखद निधन झाले. त्या गेल्या 3 वर्षांपासून लिव्हर कॅन्सर होता. देशभरातील अनेक नामांकित हाॅस्पिटल व आयुर्वेद उपचार चालू होते .मानवी हक्क अभियानचे जिल्हा अध्यक्ष पप्पूराज शेळके यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं,सुना , 3 दिर , जावा , नातवंड, असा मोठा परिवार आहे. त्यांचा काल जिंतूर रोड वरिल वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी मानवी हक्क अभियान,लाल सेना, जय हो मित्र मंडळ,आरपीआय, हमाल एकता युनियन,लहुजी शक्ती सेना, आझाद क्राती सेना,…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी (दि.29) वैशाख शुक्ल द्वितीया रोजी परभणी महानगरातून सकल हिंदू समाजाचे सहावे अवतार भगवान श्री परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो मान्यवरांसह हजारो नागरीक सहभागी होते. युवक आणि युवतींची संख्या लक्षवेधी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील मैदानावरुन मंगळवारी सायंकाळी 7 वाजता या शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळावरील हिंदू बांधवांवर अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारासह हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शहीद बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्या पाठोपाठ भगवान श्री परशुरामाच्या प्रतिमेची वेदमुर्ती बाळुगुरु असोलेकर यांच्याहस्ते विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे नंदकुमार…

Read More

परभणी (प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या यशस्वीनी महिला मंचच्या वतीने महिलांसाठी गुरुवार दिनांक 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गृह उद्योजिका तसेच महिला बचत गट यांच्यासाठी व्यासपीठ म्हणून पुढे आलेले यशस्विनी महिला मंच विविध उपक्रम राबवत आहे, महिलांना रोजच्या कामातून विरंगुळा म्हणून अनेक प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम देखील या ग्रुपच्या माध्यमातून घेतले जात आहेत. डॉ.संप्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून यशस्विनी महिला यांच्या वतीने यंदा अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता न्यू होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी होम मिनिस्टरचे सादरीकरण सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि…

Read More