परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘डी मार्ट’ मॉलचे उद्घाटन श्रीमती कस्तुराबाई शेषराव भरोसे, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजी भरोसे तसेच कृष्णा भरोसे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्याला डी मार्टचे व्यवस्थापक. पंजाब मुळे, तायडे सर, माणिक शिंदे, प्रताप घाटूळ, अर्जुन भरोसे यांच्यासह डी मार्टचे कर्मचारी, व्यापारी, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून मॉलचे लोकार्पण करण्यात आले. उपस्थितांनी मॉलची पाहणी करत विविध सुविधांची माहिती घेतली. परभणी शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, घरगुती साहित्य व इतर विविध उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, डी मार्टसारख्या आधुनिक व्यावसायिक उपक्रमांमुळे शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा सुलभ दरात उपलब्ध होतील.
कार्यक्रमाच्या शेवटी डी मार्ट परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. नव्या उपक्रमासाठी डी मार्ट परिवारास शुभेच्छा देत हा मॉल परभणीकरांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


