परभणी (प्रतिनिधी) तालुक्यातील माळसोन्ना येथील सत्यनरेंद्र लाड यांच्या अपघाती निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या लाड कुटुंबीयांनी माणूसकी व सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अवयवदानाचा निर्णय घेऊन गरजू रुग्णांसाठी नव संजीवनी उपलब्ध केली.

लाड कुटुंबियातील सत्यनरेंद्र हे रविवारी राञी गंगाखेड रस्त्यावरील टोल नाक्याजवळ एका अपघातात गंभीर जखमी झाले, परभणीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्यांचे ब्रेन डेड झाल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला. या दुःखाच्या स्थितीत कुटुंबीयांनी सत्यनरेंद्र यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला, तज्ञ डॉक्टरांसह सामाजिक कार्यकर्ते विनोद डावरे यांच्या बरोबर चर्चा करीत तो निर्णय सर्व सोपस्कार पार पाडत आज अंमलातही आणला.
परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरानुसार कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली
दि. २१ सप्टेंबर रोजीच कागदपत्रांची पूर्तता सुरू करून दि. २२ सप्टेंबर रोजी अवयव काढण्याची प्रक्रिया पार पडली. ग्रीन कॉरिडॉर द्वारे लाड यांचे फुफ्फुसे (लंग्स) डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पुणे येथे, एक किडनी सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, दुसरी किडनी धूत हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर आणि लिव्हर मेडीकव्हर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वीरित्या पाठविण्यात आले.
या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी घेत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार आणि नायब तहसीलदार रेड्डी यांनी देवगिरी हॉस्पिटलमध्ये येऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला आणि अवयवदानास संमती दिल्याबद्दल नातेवाईकांचे मनापासून आभार मानले.
हे अवयवदान यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कालिदास चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. श्रुती शहारे, डॉ. राहुल टेंगसे, डॉ. राहुल भोसले, डॉ. मनोज सोनी, डॉ. अजय कुंडगीर, डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. विवेक वाघमारे, डॉ. श्रद्धा गबाळे, डॉ. संजीवन लखमावार, मा. आमदार कल्याणराव रेंगे, गणेशराव घाडगे (जिल्हा परिषद सदस्य, दैठणा) यांनी मार्गदर्शन केले.
ऑपरेशन दरम्यान राजू दराडे, हनुमान नाईक, करण हिंगे, अबू तलहा, अहमद शेख, उमा घाटोळे, संजना सूर्यवंशी, तुकाराम मुरकुटे, श्याम रहाटे, स्वप्निल इंगळे, विकास लहाणे, आदित्य जोंधले, प्यारे सिंग टाक, संतोष घुले, नामदेव काळे, दिनेश रेंगे, विनोद गारुडी यांनी सेवा देऊन मदत केली.
दरम्यान माळशोन्नातील लाड कुटुंबीयांनी माणुसकी नाते व सामाजिक बांधिलकी जोपासून घेतलेल्या निर्णयाने एका रुग्णास मिळालेल्या नवसंजीवनीने डॉक्टरांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भारावले होते.


