सेलू,(प्रतिनिधी) : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे संचलित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 7 जुन रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात सायंकाळी 6 वाजता ‘कविता मिरगाच्या’ काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कविता मिरगाच्या काव्य मैफिलीचे हे बारावे वर्षे असून या वर्षी काव्य मैफिलीत कवी ललित अधाने (छत्रपती संभाजीनगर), सुनिल उबाळे (छत्रपती संभाजी नगर), प्रिया धारूरकर (छत्रपती संभाजीनगर), सारिका उबाळे (अमरावती) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. तर कवी संमेलनाचे सुत्रसंचलन गझलकार अरविंद सगर (परभणी) हे करतील. कवी संमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, महेश खारकर यांच्या…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) थायलंड देशातील ३५८ पंचधातूच्या बुद्धमूर्तीचा वितरण सोहळा व महागायक साजन बेंद्रे, विशाल चव्हाण यांचा भीम गीत संगीत रजनी कार्यक्रम शहरात ज्ञानोपासक कॉलेजच्या मैदानावर धम्ममय व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास थायलंड येथील भदंत फ्रमहा निंपो प्रसंडी, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पय्याबोधी थेरो , भदंत मुद्दीतानंद थेरो, भदंत मोग्गलायन व भिक्खु संघ , खा.संजय (बंडू) जाधव , आ.डॉ.राहुल पाटील , आ.राजेशदादा विटेकर , दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसंगी डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वतीने धम्म कार्यात उल्लेखनीय कार्य…
परभणी,(प्रतिनिधी) शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परभणीच्या प्रश्नासाठी नेहमीच विधानसभेत आवाज उठवला आहे तसेच सरकारकडे वेळोवेळी मागणी केली आहे त्यामुळे परभणीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा अशी मागणी आ.राहुल पाटील यांनी केली. लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. परभणीतील कृषी विद्यापीठातील बैठकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी दौऱ्यावर आले असता आ.पाटील यांनी फडणवीस यांची लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत केले आणि त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन मतदार संघातील विविध विषयावर चर्चा केली सरकारने वेळोवेळी समांतर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार…
*संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025* परभणी (प्रतिनिधी) : शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. राज्याचे कृषिमंत्री ॲड.…
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ परभणी, (प्रतिनिधी) : राष्ट्रव्यापी “विकसित कृषि संकल्प अभियानाचे” आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथ वाहनाला मुख्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता,उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या…
परभणी (प्रतिनिधी) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती प्रभावती बाळकृष्णराव मुळे यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता वृद्धकाळामुळे निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी दहा वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी शिवाजीनगर येथील डॉक्टर प्रकाश मुळे यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान श्रीमती मुळे यांच्या पश्चात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रकाश मुळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. प्रमोद मुळे ,ज्ञानोपासक महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक रविंद्र मुळे यांच्यासह सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
परभणी, (प्रतिनिधी) : मान्सून कालावधीत विशेषतः जून ते सप्टेंबर या महिन्यात वीज पडून जिवीत व वित्त हानी होते. ही जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी “दामिनी”अॅप तयार केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. “दामिनी” अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपच्या माध्यमातून आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडणार असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणापासुन सुरक्षित स्थळी जावे. अशा वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. याबाबतच्या सूचना अॅपद्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी “दामिनी” ॲप…
पालम (प्रतिनिधी) पावसाळा अगदी दारावर येऊन थांबला असताना सुद्धा पालम ते राणी सावरगाव या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून हे काम अत्यंत संत गतीने चालू आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून शेतीकामासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर जाता येता सुद्धा शेतकऱ्यांना येत नाही पालम ते राणीसावरगाव रस्त्याच्या कामासाठी खुप वर्ष प्रतीक्षा करण्यात आली विविध संघटना राजकीय पक्ष आपापले मतभेद विसरून हा रस्ता व्हावा यासाठी आंदोलन करण्यात आली. आणी त्यांच्या प्रयत्नांना यश आले रोडचे काम पण दिपवाळी झाल्यानंतर सुरुवात झाले पण ते काम एवढे संथ गतीने सुरुवात आहे की पाऊसाळा सुरु होण्यास अवघे कधी दिवस शिक्कल आहेत अजुन…
परभणी: (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री .एकनाथजी शिंदे व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशावरून दि. २२ रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन दि. २२ गुरुवार रोजी सकाळी १० वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व देशवासीयांच्या भावना ओळखून पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ‘ऑपरेशन सिंदूर’ याद्वारे अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले. पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या…
पालम प्रतिनिधी ) दिनांक 14 फेब्रुवारी मार्च 2025 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबोरे सर आणि प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारूती कारवार तसेच माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर श्री गुडदे सर आणि माजी मुख्याध्यापक श्री कानगुले सर हे होते शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 272 विद्यार्थी परीक्षेला बसली त्यापैकी 253 उत्तीर्ण झाले विद्यालयाचा निकाल सरासरी 93% लागला 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 34 असून त्यांचा विद्यालयातर्फे आज सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले…

