Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी)  : छत्रपती संभाजीनगर विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा २०२६-२७ मध्ये परभणीच्या ओजस्विता राहुल पाटील हिने दमदार कामगिरी करत ६० ते ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे तिची आगामी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ओजस्विता पाटील ही परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांची कन्या आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा परिषद परभणी आणि परभणी डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान परभणी डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशनच्या मिशन लक्षवेध बॉक्सिंग सेंटर येथे या विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामान व पावसाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही वेगाने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व शासनाच्या नियमानुसार लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे. जिल्ह्यातील संबंधित महसूल, कृषी व ग्रामस्तरीय यंत्रणांना पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची स्थिती, नुकसानीचे स्वरूप व बाधित क्षेत्राची माहिती संकलित करीत आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून, प्राप्त माहितीच्या आधारे शासनाच्या प्रचलित निकषांनुसार…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  : ‘सेवा संकल्प अभियान’, आयसीडीएस डे, पोषण माहच्या निमित्ताने पाथरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे आज विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील सुमारे २५० किशोरवयीन मुलींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी किशोरवयीन मुलींचा संतुलित आहार, पोषण, बालविवाह प्रतिबंध आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयात शरीराची वाढ व विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी सकस व पौष्टिक आहाराचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. नंदाताई गायकवाड, एनजीओ, पाथरी यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका धनासुरे मॅडम यांनी वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील मंगरूळ (ता. घनसावंगी) येथील त्याच्या राहत्या घरातून गुरुवारी (दि. 1) ताब्यात घेतले. रमेश अण्णा शिंदे (वय 30) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून विविध घरफोडीच्या गुन्ह्यांतील 30.20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांची बाजारभावानुसार अंदाजे किंमत 4 लाख 32 हजार 200 रुपये आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती घेत असताना आरोपी रमेश शिंदे हा त्याच्या मंगरूळ येथील राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पथकाने…

Read More

परभणी (प्रतिनिधी) भाग्यलश्रीक्ष्मी लाँस बेलेश्वर मंदिर परभणी येथे मन्नेरवारलु समाज संघटना परभणी जिल्हयातील सर्व समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. सदरील बैठकीत जिल्हा संघटनेची कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष राधाजी कनसटवाड, उपाध्यक्ष – डॉ. काशिनाथ दतराम पल्लेवार सेलु उपाध्यक्ष – संतोष विठ्ठलराव भुसेवाड सरचिटणीस – डाँ. पंढरीनाथ लखमवार सहसचिव – नामदेवराव वल्लमवाड सहसचिव – रामराव संतरामजी पेरके कोष्याध्यक्ष – सुनील बबनराव कनले महिला प्रतिनिधी – सौ. व्यंकनबाई चेनलवाड सदस्य – भगवानराव सुदेवाड, पोशट्टी गोपोड, गणेशराव कनके सल्लागार – मारोतराव कोंडरे, दत्तात्रय आकुलवाड, संतुकराव माधवराव वटाणे वरील संघटनेस उपस्थित समाज बांधवांनी मान्यता दिली.

Read More

मुंबई, (प्रतिनिधी: नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. *विद्यार्थ्यांशी थेट संवाद* राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत व शाळास्तरावर स्वच्छता मोहीम, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, मानवी साखळी तसेच स्वच्छतादूतांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आज बुधवार दिनांक.30 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि विकसित भारताच्या संकल्पनेपर्यंत विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत असून, त्याला नागरिक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामध्ये पालम तालुक्यातील धनेवाडी व आनंदवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच ग्रामपंचायत गोपा येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांमध्ये ९ ते १० या वयोगटामध्ये…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विविध मार्गांवर साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. हजूर साहिब नांदेड-हजरत निजामुद्दीन, जालना-छपरा आणि हजूर साहिब नांदेड-उधना या मार्गांवर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात विशेष गाड्यांच्या एकूण 38 फेर्‍या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 07621 हजूर साहिब नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी शनिवार, 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान सात फेर्‍या करेल. परतीची गाडी क्रमांक 07622 हजरत निजामुद्दीन-हजूर साहिब नांदेड रविवार, 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान सात फेर्‍या करणार आहे. या दोन्ही गाड्यांना पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट…

Read More

जिंतूर (प्रतिनिधी) जिंतूर तालुक्यातील मोह खेड्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने एका शेतात मोठी धडक कारवाई करीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. दरम्यान शेत ठोक्याने घेऊन गांजाची लागवड केल्याप्रकरणी परमेश्वर चांदणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतप्रिया सिंग,पोलीस अधीक्षक अजित टीके,पोलीस अधीक्षक अनुज तारे, आणि पोलीस उपाधीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या कारवाई पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार, एपो ऊ.नी . संतोष वावळ हनुमंत जकवेवाड,पिराजी निळे, प्रशांत कोंकडे,काशिनाथ कुंडगीर रोहित मगर,विकास तायडे,शंकर कोसवेवाड, गणेश जाधव,महेंद्र दासरवार,तानाजी येळगे, आणि शेख मुजीब यांचा सहभाग होता.

Read More

जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली (दि.२९) जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची संख्या, तपासण्या, तपासणीनंतर करण्यात आलेली कारवाई तसेच १ एप्रिल २०२६ पासून आजपर्यंत अन्न नमुन्यांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या अन्न आस्थापनांच्या तपासण्या, दंडात्मक कारवाई, जप्ती व धाडीची प्रकरणे याबाबतची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. तसेच दूध भेसळीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष…

Read More