परभणी,(प्रतिनिधी) : घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील मंगरूळ (ता. घनसावंगी) येथील त्याच्या राहत्या घरातून गुरुवारी (दि. 1) ताब्यात घेतले.
रमेश अण्णा शिंदे (वय 30) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून विविध घरफोडीच्या गुन्ह्यांतील 30.20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांची बाजारभावानुसार अंदाजे किंमत 4 लाख 32 हजार 200 रुपये आहे.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती घेत असताना आरोपी रमेश शिंदे हा त्याच्या मंगरूळ येथील राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पथकाने मंगरूळ येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले.
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने साथीदार संजय तुकाराम गायकवाड (रा. भोकरदन) आणि अमोल सुरेश पवार (रा. मंगरूळ, ता. घनसावंगी, जि. जालना) यांच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील पालम आणि चुडावा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून 30.20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पालम पोलिस ठाण्यातील दोन आणि चुडावा पोलिस ठाण्यातील एक, अशा एकूण तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी पालम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सरोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, रंगनाथ दुधाटे, नेताजी गीते, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे आणि विलास बहुरे यांनी केली.
Saturday, October 3
ताज्या बातम्या:
- ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; चौथ्या दिवशी ३१ इच्छुकांनी घेतले ५९ नामनिर्देशन पत्रे; १० उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल
- धसाडी परिसरात 153 किलो गांजा जप्त : शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड; एकास पोलिसांनी घेतले ताब्यात
- वडगाव जि. प. शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला ध्यान-योगाचा आनंद; सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
- ऑटो एलपीजी उद्योग वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत; नितीन सोळंके ची मागणी
- बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रवीण सोनोने यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
- विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत ओजस्विता राहुल पाटीलचे सुवर्णयश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
- दुष्काळी पंचनामे वेगाने; प्रशासन अलर्ट मोडवर : परभणी जिल्ह्यात पीक परिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा
- सेवा संकल्प अभियान; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पोषण, बालविवाह व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन


