परभणी,(प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विविध मार्गांवर साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. हजूर साहिब नांदेड-हजरत निजामुद्दीन, जालना-छपरा आणि हजूर साहिब नांदेड-उधना या मार्गांवर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात विशेष गाड्यांच्या एकूण 38 फेर्या चालविण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 07621 हजूर साहिब नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी शनिवार, 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान सात फेर्या करेल. परतीची गाडी क्रमांक 07622 हजरत निजामुद्दीन-हजूर साहिब नांदेड रविवार, 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान सात फेर्या करणार आहे. या दोन्ही गाड्यांना पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट आणि मथुरा स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांना 1 एसी, 2 एसी, 3 एसी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
गाडी क्रमांक 07651 जालना-छपरा विशेष गाडी बुधवार, 7 ते 28 ऑक्टोबरदरम्यान चार फेर्या करेल, तर गाडी क्रमांक 07652 छपरा-जालना विशेष गाडी शुक्रवार, 9 ते 30 ऑक्टोबरदरम्यान चार फेर्या करणार आहे. या गाड्या छत्रपती संभाजीनगर, नगरसोल, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, विंध्याचल, वाराणसी, औंरीहार, गाझीपूर सिटी आणि बलिया स्थानकांवर थांबतील. या गाड्यांमध्ये 2 एसी, 3 एसी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
गाडी क्रमांक 07605 हजूर साहिब नांदेड-उधना विशेष गाडी सोमवार, 5 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान आठ फेर्या करेल. परतीची गाडी क्रमांक 07606 उधना-हजूर साहिब नांदेड मंगळवार, 6 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरदरम्यान आठ फेर्या करणार आहे. या गाड्यांना पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार आणि व्यारा येथे थांबा असेल. गाडी क्रमांक 07606 ला शेगाव येथेही थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांमध्ये 1 एसी, 2 एसी, 3 एसी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
सणासुदीच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त प्रवासी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येत असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
Thursday, October 1
ताज्या बातम्या:
- नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’; मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद
- सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्वच्छतेपासून ‘विकसित भारत’पर्यंत विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
- सणासुदीच्या गर्दीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या : नांदेड-निजामुद्दीन, जालना-छपरा आणि नांदेड-उधना मार्गावर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेर्या
- जिंतूर तालुक्यातील मोहखेड्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाईत सव्वा कोटीचा गांजा जप्त
- अन्न सुरक्षेबाबत निष्काळजीपणा नको; प्रभावी कारवाई करा_ जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश
- जल्लोष लोककलेचा महोत्सवाचे पारितेाषिक वितरण : समूह नृत्यात जिंतूरातील सिद्धेश्वर विद्यालय तर समूह गायनात परभणीतील बालविद्यामंदिरची बाजी
- ५ – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; पहिल्या दिवशी १९ इच्छुकांनी घेतले ३० नामनिर्देशन पत्र ; एकाही उमेदवाराचे नामनिर्देशन दाखल नाही
- मराठवाड्यातील शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी नगदी हेक्टरी 50 हजारांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करा : माजी आमदार सौ. मीराताई रेंगे


