परभणी (प्रतिनिधी) थायलंड देशातील ३५८ पंचधातूच्या बुद्धमूर्तीचा वितरण सोहळा व महागायक साजन बेंद्रे, विशाल चव्हाण यांचा भीम गीत संगीत रजनी कार्यक्रम शहरात ज्ञानोपासक कॉलेजच्या मैदानावर धम्ममय व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमास थायलंड येथील भदंत फ्रमहा निंपो प्रसंडी, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पय्याबोधी थेरो , भदंत मुद्दीतानंद थेरो, भदंत मोग्गलायन व भिक्खु संघ , खा.संजय (बंडू) जाधव , आ.डॉ.राहुल पाटील , आ.राजेशदादा विटेकर , दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रसंगी डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वतीने धम्म कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपासकांचा बुद्ध मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला होता. या वेळी बोलताना खा.संजय जाधव म्हणाले कि, सिद्धार्थभाऊ हे समाजासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. राजकारणातील ते उभरते नेतृत्व असून समाजाने पाठबळ देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आमदार म्हणून त्यांची निवड व्हावी या कामी मित्र पक्ष म्हणून आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत . आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले कि, समाज सेवेसाठी डॉ.सिद्धार्थभाऊ हे काम करीत आहेत.त्यांनी परभणी ते चैत्यभूमी दादर ५८० किमी भव्य धम्म पदयात्रा काढली . मांडाखळी परिसरात ५० फूट उंचीचा भव्य पंचरंगी ध्वज उभारला आहे. त्या ठिकाणी विपश्यना केंद्र निर्माण करणार आहेत असे ते म्हणाले.
यावेळी डॉ.गगन मलिक म्हणाले कि जयभीम मध्ये ताकद आहे .बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी बुद्ध मूर्ती वाटप करण्याचा संकल्प केला. पुढे बोलताना ते म्हणाले कि आपण धम्माचे अनुयायी आहोत काय धम्म पालन पंचशिल आचरण करतो काय? असा सवाल त्यांनी उपस्थिता समोर व्यक्त केला. परभणी हि धम्म क्रांतीची भूमी आहे. भारत बुद्धमय करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. थायलंड येथील भदंत निप्रो प्रसंडी यांनी इंगाजित धम्मदेसना दिली त्यांचा डॉ. गगन मलिक यांनी मराठीत अनुवाद केला. धम्मदेशनापर बोलताना ते म्हणाले कि, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ३५८ बुद्ध मूर्तीचे वाटप केले हा कार्यक्रम परभणीत आयोजित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. धम्म देसनेत बोलताना ते म्हणाले कि बुद्ध धम्म संघाचा पाठ करावा बुद्धमूर्तीच्या रूपाने घरात बुद्ध आले आहेत त्यांची पूजा करावी.
सत्कारमूर्ती डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सांगितले मी धम्माचा अनुयायी असून समाजासाठी रस्त्यावर लढणारा आहे. डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने उत्पन्नाचा विसावा भाग समाजासाठी दिला पाहिजे धम्माची चळवळ गतिमान करणार आहे येणाऱ्या काळात जागतिक दर्जाचे महाबुध्द विहार उभारणार असल्याचे मनोगत व्यक्त केले . यावेळी दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्ध वंदना पूजा विधी करण्यात आला उपासकाने भिक्खु संघ व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहर ग्रामीण भागातील धम्म उपासक महिला पुरुष तरुण युवा वर्गाची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.