परभणी (प्रतिनिधी) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून डॉ. संदीप चव्हाण यांची 3 वर्षा करिता नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण, ग्राहक जागृती तसेच ग्राहकांच्या विविध समस्या शासनाच्या संबंधित यंत्रणेसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद महत्त्वाची भूमिका बजावते. या परिषदेत डॉ. संदीप चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने ग्राहकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. संदीप चव्हाण हे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक व ग्राहक जागृतीच्या विविध उपक्रमांमध्ये २० वर्षा पासून सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर कार्य केले असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत झालेल्या या नियुक्तीबद्दल परभणी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्राहकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करून ग्राहक संरक्षणाच्या चळवळीला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. संदीप चव्हाण यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल डॉ. संदीप चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


