गंगाखेड. (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 29 एप्रिल रोजी परशुराम जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले असून गंगाखेड शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे
शहरातील पाठक गल्ली येथील कुंदेश्वर मंदिरापासून सायंकाळी चार वाजता शोभायात्रा निघणार असून शेटे गल्ली भगवती चौक श्रीराम चौक मार्गे शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे शोभायात्रेचा समारोप होणार असून या ठिकाणी ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त ब्रह्मवंदानी या शोभा यात्रेत सामील व्हावे असे आवाहन भगवान परशुराम जन्मोत्सव समिती व व तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आले आहे..